JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Pathaan: रितेश देशमुखलाही 'पठाण'चं वेड; शाहरुखच्या सिनेमासाठी केलेलं ते ट्विट चर्चेत

Pathaan: रितेश देशमुखलाही 'पठाण'चं वेड; शाहरुखच्या सिनेमासाठी केलेलं ते ट्विट चर्चेत

बॉलिवूड किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर चित्रपटात पुनरागमन केलं आहे.

जाहिरात

शाहरुख खान-रितेश देशमुख

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी- बॉलिवूड किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान चा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर चित्रपटात पुनरागमन केलं आहे. शाहरुखचा चाहता वर्ग आज मोठा आनंदात आहे. एकीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला विरोधही केला जात आहे. अशात या चित्रपटा दोन गट पडलेले दिसून येत आहेत. दरम्यान आता अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाबाबत केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. देशभरात शाहरुख खानच्या ‘पठाण’ची धूम दिसून येत आहे. या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पठाण आगामी काळात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असा अंदाज दर्शविण्यात येत आहे. अशातच आता अनेक बॉलिवूड कलाकार शाहरुख खानच्या ‘पठाण’ला शुभेच्छा देत आहेत. तसेच पठाण पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जाण्याची विनंती करत आहेत. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखनेसुद्धा शाहरुख खानच्या पठाणसाठी केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे. **(हे वाचा:** Pathaan: काय सांगता? शाहरुख खानने ‘पठाण’साठी घेतलीये इतकी फी; दीपिका-जॉनपेक्षा पाचपट जास्त आहे आकडा ) मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाउंटवर पठाणचा पोस्टर शेअर करत लिहलंय, ‘वादळ येत आहे… तुमचा सीटबेल्ट बांधून तयार राहा… खूप जास्त प्रतीक्षा करायला लावली…. पण डिअर शाहरुख खान तुला खूप शुभेच्छा… पठाण पाहण्यासाठी मी आधीच माझं तिकीट बुक केलं आहे’. असं म्हणत रितेश देशमुखने शाहरुख खानच्या पठाणसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

पठाण चित्रपटात शाहरुख खानसोबत बॉलिवूड दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम आहे. दीपिका आणि शाहरुखच्या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहून चाहते प्रचंड खुश आहेत. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पसंत पडते. जॉन तर जॉन आणि शाहरुख पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोघांमध्ये चांगलीच ऍक्शन पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुखबाबत सांगायचं झालं तर, रितेश सध्या आपल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. वेडने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा पार करत नवा रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटात जिनिलियाने तब्बल १० वर्षानंतर पडदयावर पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. ज्याला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या