JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Pathaan: पुण्यात 'पठाण' चित्रपटावरून पेटला वाद; बजरंग दलाकडून झाली 'ही' कारवाई

Pathaan: पुण्यात 'पठाण' चित्रपटावरून पेटला वाद; बजरंग दलाकडून झाली 'ही' कारवाई

बेशरम रंग या गाण्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ठिकठिकाणी चित्रपटाविरोधी कारवाई होत असताना आता पुन्हा मोठी बातमी समोर येत आहे.

जाहिरात

पठाण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘ पठाण ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर  रिलीज होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. आता ते चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. चित्रपटात दीपिका, शाहरुख आणि जॉनचे दमदार खतरनाक स्टंट पाहायला मिळणार आहेत. पण बेशरम रंग या गाण्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ठिकठिकाणी चित्रपटाविरोधी कारवाई होत असताना आता पुन्हा मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच काही ठिकाणी त्याला कडाडून विरोध केला जात आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या कपड्यांवर आक्षेप घेण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले दिसून येत आहेत. यामध्ये काहींनी पठणला समर्थन दिलं आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच आता ‘पठाण’ विरोधात पुण्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. हेही वाचा- ‘पठाण’ च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शो मध्ये का नाही आला शाहरुख खान? अभिनेत्यानेच दिलं उत्तर ‘पठाण’ ला सुरुवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान हा चित्रपट रिलीज न करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अशातच आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील  एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राहुल चित्रपटाबाहेरील पोस्टर्स काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे पठाणच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येत आहे. पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक झाले. काल शिवाजीनगर येथील राहुल  चित्रपटगृहाबाहेरील बजरंग दलाने पोस्टर्स काढले आहेत. शाहरुख खानच्या काही फॅन्स ने चित्रपट गृहा बाहेर हे पोस्टर लावले होते. यानंतर बजरंग दलाकडून राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे भलेमोठे पोस्टर लगेच हटवण्यात आले. पठाणचा हा वाद आता अजून किती चिघळणार हे येणाऱ्या काळात कळेल.

काही दिवसांपूर्वी ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या कलाकारांच्या चाहत्यांना हे गाणं पसंत पडलं असलं, तरी काही लोकांनी या गाण्यावर आक्षेप घेत कडाडून विरोध केला आहे. गाण्यामध्ये दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे आमच्या भावना दुखावल्याचा आरोप ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा सर्व वाद सुरु झाला होता. हे प्रकरण सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आलं होतं. यावेळी सेन्सॉर कमिटीने गाण्यात बदल करुन रिलीज करण्याचा आदेश दिला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या