परिणीती चोप्रा
मुंबई, 10 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ने 11 वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने पदार्पणातच आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. पण आजही ती बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. तिची चुलत बहीण प्रियांका सध्या ग्लोबल स्टार बनली आहे. पण परिणीती अजूनही चित्रपटसृष्टीत टिकण्यासाठी संघर्षच करत आहे. परिणीती चोप्राला बऱ्याच दिवसांपासून एकही हिट चित्रपट मिळालेला नाही. नुकतीच ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत उंचाई या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास होता. आता परिणितीने आपल्या करियर विषयी मोठा खुलासा केला आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा परी अपयशाच्या टप्प्यातून गेली. तिचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. परिणीतीचे सलग 4 चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. परिणीती चांगली अभिनेत्री आहे. तीने आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. सायना नेहवालच्या बायोपिक, द गर्ल ऑन द ट्रेन असा दमदार भूमिका तिला मिळाल्या आहेत. पण परिणीती तिच्या पात्रांना न्याय देऊ शकली नाही. मात्र, आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे करिअर रुळावर आले आहे. हेही वाचा - Pushpa 2 मध्ये होणार डबल धमाका! अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा हा सुपरस्टार आता यशाची चव चाखताना मात्र परिणीती तिच्या अपयश विसरलेली नाही. अलीकडेच एका मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केले. ती म्हणाली कि, ‘मी पराभव पाहिला आहे. या पराभवाने मला उभे केले असले तरी खूप संघर्ष आणि मेहनतीनंतर मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. माझा हा प्रवास माझ्या दृष्टीने अतिशय मनोरंजक होता. मला विश्वास आहे की तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते.’'
मुलाखतीदरम्यान परिणीती चोप्राने सांगितले की, तिने 10 वर्षांपूर्वी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. करिअरच्या अगदी सुरुवातीलाच आदित्य चोप्राने त्याला एक गोष्ट सांगितली होती की, तू एक यादी बनवून त्या कलाकारांची आणि दिग्दर्शकांची नावे लिही ज्यांच्यासोबत तुला भविष्यात काम करायचे आहे. त्यात मी सूरज सरांचे नाव लिहिले होते. ''
ती पुढे म्हणाली, ‘‘आता त्याच्यासोबत ‘उंचाई’ या चित्रपटात काम करून माझे मोठे स्वप्न साकार झाले आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी कधी त्याच्यासोबत त्याच्या चित्रपटाचा भाग होईन.’’ परिणीतील पदार्पणातच इश्कजादे या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मात्र तिच्या अभिनयाची जादू काही प्रेक्षकांवर चालली नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळात परिणीती कोणत्या चित्रपटात दिसते, त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.