परिणीती चोप्राने राघव चड्ढासोबत लग्नाबाबत पहिल्यांदाच दिलं उत्तर
मुंबई, 19 एप्रिल- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रियांका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्रा सध्या आपल्या चित्रपटांमुळे नव्हे तर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या लव्ह लाईफबाबत लोकांना जास्तच उत्सुकता लागून आहे. परिणीती ‘आप’ चे खासदार राघव चड्ढासोबत दिसून आल्यापासून त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या साखरपुड्याबाबत आणि लग्नाबाबत सतत बातम्या समोर येत असतात. नुकतंच प्रियांका पती निक जोनाससोबत भारतात आली होती. तेव्हाही प्रियांका बहीण परिणीती आणि राघवच्या साखरपुड्यासाठी आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र असं काहीही झालं नाही. दरम्यान आता परिणितीने स्वतः या विषयावर मौन सोडलं आहे. तसं पाहता बॉलिवूड क्रिकेट, बॉलिवूड राजकारण यांचा संबंध नवीन नाही. याआधीही अनेक सेलिब्रेटींना अशी लग्ने केली आहेत. दरम्यान अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चढ्ढा एकत्र दिसल्यापासून त्यांच्या डेटिंगच्या आणि लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी एक राजकारणी आणि अभिनेत्रीची जोडी जमली असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान आता लाइफस्टाइल एशिया इंडियाशी बोलताना अभिनेत्रीने नाव न घेता आपल्या डेटिंगच्या चर्चांवर खुलासा केला आहे.पाहूया परिणितीने नेमकं काय म्हटलं आहे. (हे वाचा: बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री जिने सख्ख्या भावासोबत केलाय रोमान्स, सीनने उडालेली खळबळ, कोण होती ती नायिका? ) परिणीती चोप्रा म्हणाली की, ‘खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे. कारण तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जगासमोर येते आणि मीडिया हे त्याचं आउटलेट आहे. आपण स्वतःला, आपला चेहरा आणि आपलं नाव प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तथापि, माझ्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं आणि काही वेळा खूप वैयक्तिक होऊन अपमानाची रेषा ओलांडणं यात एक बारीक रेष आहे. असं कधी घडलं किंवा जर काही गृहीत धरलं जात असेल तर मी या गोष्टी जेव्हा-तेव्हा स्पष्ट करीन. आणि जिथे स्पष्टीकरण देण्याची गरज नसेल तर मी देणार नाही’. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्याबद्दलच्या बातम्यांना जोर तेव्हा मिळाला जेव्हा, राघव चड्ढा यांनी हसत हसत म्हटलं होतं की, मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारु नका. राघवने काहीही सांगितलं नसलं तरी आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी अभिनंदन करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
दरम्यान परिणीती चोप्राचा मित्र आणि बॉलिवूड-पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधूनेसुद्धा याबाबत वक्तव्य करत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला होता. हार्डीने म्हटलं होतं की, ती एक नवं आयुष्य सुरु करत आहे. हे खरंच आता घडत आहे. याचा मला आनंद आहे. मी फोन करुन तिला शुभेच्छाही दिल्याचं त्याने म्हटलं होतं.