मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे फोटो तसेच व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती तिच्या फॅशन सेन्स , डान्स आणि सौंदर्यामुळे लोकांमध्ये नेहमी चर्चेत असते (Nora Fatehi dance video) . नोराचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे (Nora Fatehi belly dance video) . यामध्ये नोराची हॉट आणि बोल्ड स्टाईल पाहून चाहते क्लिन बोल्ड झाले आहेत. व्हिडिओमध्ये नोरा बेली डान्स करताना दिसत आहे. तिने क्रॉप टॉप परिधान केला आहे आणि सिझलिंग स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे. नोराचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरील एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. सुमारे 5 तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला जवळपास 400 व्ह्यूज मिळाले आहेत.
नोराने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला होता पण तिने तो अपलोड केल्याच्या काही वेळानंतर डिलीट केला होता. फॅन पेजने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. नोराने ब्लू शॉर्ट्ससह क्रॉप टॉप घातला आहे. नोराने असे अनेक डान्स व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. वाचा : ED कार्यालयात पोहोचली अभिनेत्री नोरा फतेही; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात होणार चौकशी नोरा बॉलिवूडची डान्सिंग क्वीन आहे, यात काहीच शंका नाही. नेरा तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि बुद्धीने म्हणजे हाजिर-जबाबीपणामुळे प्रेक्षकांना प्रभावित करते. नोराच्या कामाबद्दल बोलायचे तर की ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. लवकरच ती ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटात जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. वाचा : ‘जावेद यांच्याशी भांडण झाल्यावर करते एक काम’, शबाना आझमींनी सांगितलं सुखी संसाराचे रहस्य यासोबतच आज माध्यमांमध्ये नोराचे नाव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नोरा फतेही आज ईडी कार्यालयात पोहोचली होती. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आज दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे सगळीकडे नोराचे नाव चर्चेत आहे.