मुंबई, 9 जून : सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना एक चांगली बातमी आली आहे. 94 वर्षीय कवी पद्मश्री एएम जुत्शी गुलजार देहलवी यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना 1 जून रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण आता त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत नोएडा गौतम बुद्ध नगरचे डीएम सुहास एलवाय यांनी ट्वीटरवरून माहिती दिली. डीएम सुहास एलवाय यांनी त्यांच्या ट्विटरवर 94 वर्षीय कवी पद्मश्री एएम जुत्शी गुलजार देहलवी यांचा एक फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘94 वर्षीय व्यक्तीनं कोरोनावर मात करणं ही माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आम्ही सर्वजण तुमच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.’ COVID19: 30 सेकंद हा Mouthwash वापरा आणि कोरोनाला गुडबाय करा!
नोएडा गौतम बुद्ध नगर सेक्टर-26 मध्ये राहणारे ज्येष्ठ कवी पद्मश्री एएम जुत्शी गुलजार देहलवी यांची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 1 जूनला शारदा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची तब्येत खूप खालावली होती. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना तीन दिवसांनी आयसोलेशनच्या सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. हॉस्पिलटमधून डिस्चार्ज झाल्यानंतर कवी एम जुत्शी गुलजार देहलवी भावुक झाले होते. त्यांनी मेडिकल स्टाफचे आभार मानले. ते म्हणाले, ‘तुम्ही मला नवं जीवन दिलं आहे. जेव्हा मी चालू-फिरू लागेन तेव्हा तुम्हाला सर्वांना जेवणासाठी घरी बोलवेन.’ संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन कोरोनावर आणखी एक प्रभावी औषध, 3 दिवसांतच रुग्णांना आराम; शास्त्रज्ञांचा दावा