JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लोकप्रिय अभिनेत्रीनं गमावलं आपलं तान्हुलं बाळ; दुःख सांगत म्हणाली 'त्या धक्क्यातून सावरायला...'

लोकप्रिय अभिनेत्रीनं गमावलं आपलं तान्हुलं बाळ; दुःख सांगत म्हणाली 'त्या धक्क्यातून सावरायला...'

‘गोलमाल रिटर्न्स’, ‘नो एण्ट्री’, ‘अपना सपना मनी मनी’ अशा चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रीनं वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात

सेलिना जेटली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20  जुलै :  ‘नो एण्ट्री’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘गोलमाल रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये महत्वाच्या  साकारलेली अभिनेत्री म्हणजेच सेलिना जेटली. अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर ही अभिनेत्रीने अचानक चित्रपटसृष्टीपासून गायब झाली. करिअरच्या सुरुवातीला तिने फॅशन इंडस्ट्रीत काम केलं आणि नंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेत संसार थाटला. सेलिनाने 2011 मध्ये ऑस्ट्रियन हॉटेल व्यवसायी पीटर हागसोबत लग्न केलं. यानंतर मार्च 2012 मध्ये ती जुळ्या मुलांची आई झाली. 2017 मध्ये सेलिना पुन्हा गरोदर राहिली. अभिनेत्रीने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला, त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला. सेलिनाने नुकतंच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत ही हृदयद्रावक घटना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री सेलिना जेटलीने सोशल मीडियावर नुकतंच तिच्या आयुष्यातील एक दुःखद प्रसंग शेअर केला आहे. सेलिनाने तिचा दिवंगत मुलगा शमशेरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तिच्या दुसऱ्या गरोदरपणाच्या 32 व्या आठवड्यात प्रसूतीची वेळ आली आणि नंतर हृदयाच्या आजारामुळे शमशेरला गमावलं ही घटना शेअर केली आहे.

सेलिना जेटलीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिवंगत मुलगा शमशेरचा फोटो शेअर केला आणि त्याच्या आठवणीत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. सेलिना म्हणाली की , ‘आमच्या आयुष्यातील या कठीण काळातुन बाहेर येण्यासाठी मला 5 वर्षे लागली माझ्या पतीमुळं मी याविषयी बोलण्याचं धाडस करू शकले. या पाच वर्षात मी फक्त बाळ गमावल्याचं दुःख सोसत होते. पीटर आणि माझी इच्छा आहे की अशा पालकांनी हे जाणून घ्यावे की ते यावर मात करू शकतात.’ ‘60 दिवस होऊनही कोणाला अटक नाही’; मणिपूरमधील धक्कादायक Video वर बॉलिवूड कलाकारांच्या तीव्र प्रतिक्रिया फोटोमध्ये सेलिना आपल्या दिवंगत मुलाला मिठी मारताना दिसत आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘वैयक्तिक अनुभवातून आम्ही दोघेही खात्री देऊ शकतो की तुमचे प्री-मॅच्युअर मूल वाचूही शकतं. लक्षात ठेवा की बहुतेक अकाली बाळ जगतात आणि पूर्णपणे सामान्य, निरोगी जीवन जगतात.’

संबंधित बातम्या

सेलिना जेटली पुढे म्हणाली, ‘हृदयाच्या आजारामुळे आम्ही आमच्या जुळ्यांपैकी एक बाळ आमचा  शमशेर गमावला. माझ्या वडिलांच्या निधनामुळे मला प्रेग्नन्सीच्या 32 व्या आठवड्यात अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या. पीटर आणि माझ्यासाठी हे खूप कठीण होते, परंतु आमच्या दुस-या मुलाचं स्वागत करण्यासाठी आम्ही आनंदाने तयार झालो. मी शमशेरा आणि आर्थर अशा दोन जुळ्या बाळांना जन्म दिला पण हृदयाच्या आजारामुळे शमशेर आम्हाला सोडून गेला. त्याच्या मृत्यूनंतर आम्ही पूर्ण हादरलो होतो. पण त्यानंतर आम्ही आमचं दुसरं बाळ आर्थरची अधिक काळजी घेतली. त्याच्यासाठी आम्ही एक महिना दुबईच्या  राहिलो.’ असा खुलासा सेलिनानं केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या