JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आलिया की रणबीर? कोणावर गेली बेबी गर्ल, आजी नितू कपूर म्हणाल्या...

आलिया की रणबीर? कोणावर गेली बेबी गर्ल, आजी नितू कपूर म्हणाल्या...

नातीच्या जन्मानंतर नीतू कपूरचा आनंद तर पाहण्यासारखा आहे. आजी नितू कपूरने नुकताच पापाराझींसोबत संवाद साधला यावेळी त्यांना मुलगी कोणासारखी दिसते आलिया की रणबीर याविषयी सांगितलं.

जाहिरात

आलिया-रणबीर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 नोव्हेंबर :  बॉलिवूड  अभिनेत्री  आलिया भट्ट  आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आई बनल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा पहायला मिळतेय ती कपूर कुटुंबियांची. भट्ट आणि कपूर कुटुंबीय नातीच्या आगमनाने भारावून गेले आहेत. अशातच नातीच्या जन्मानंतर नीतू कपूरचा आनंद तर पाहण्यासारखा आहे. आजी नितू कपूरने नुकताच पापाराझींसोबत संवाद साधला यावेळी त्यांना मुलगी कोणासारखी दिसते आलिया की रणबीर याविषयी सांगितलं. रणबीर-आलियाच्या मुलीच्या जन्मानंतर नीतू कपूरला हॉस्पिटलबाहेर पापाराझींनी कॅमेऱ्यात स्पॉट केले. पापाराझींनी नीतू कपूरला विचारले की, आलिया भट्ट रणबीर कपूरचे बाळ कोणावर गेले आहे? याबाबत नीतू कपूर म्हणाल्या, “सध्या खूप लहान आहे, हे आजच घडले आहे, कोणावर गेले आहे ते मला माहीत नाही”. नीतू यांनी सांगितले की, आलिया पूर्णपणे बरी आहे. तिची तब्येत खूप चांगली आहे. प्रसूतीनंतर डिस्चार्ज झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

संबंधित बातम्या

आजी झाल्याबाबात काय वाटत आहे? असं विचारण्यात आल्यावर “मी काय सांगू… मी खूप आनंदी आहे… मी खरोखर खूप आनंदी आहे, असं नितू म्हणाल्या. नीतू जेव्हा जेव्हा पापाराझींना भेटतात तेव्हा ती खूप प्रेमाने बोलत असतात. यादरम्यान एका पापाराझीनला नीतू यांनी तब्येतीबद्दलही विचारले.

दरम्यान, तू कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. या वयातदेखील त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. त्या सतत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. कधी फोटो तर कधी व्हिडीओ शेअर करत त्या आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यांनी नातीच्या जन्मानंतर आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केलेला पहायला मिळाला.  नीतू सिंग यांनी या पोस्टमध्ये लिहलंय’’,… आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आहे. आमचं बाळ इथे आमच्यासोबत आहे… आणि ती काय चमत्कारिक मुलगी आहे. आम्ही अधिकृतपणे प्रेमाचा विस्फोट करत आहोत. धन्य पालक, खूप प्रेम प्रेम प्रेम आलिया आणि रणबीर'.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या