मुंबई, 24 जुलै : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस सध्या मियामीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्टी एंजॉय करत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचा वाढदिवस या ठिकाणी धडाक्यात साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रियांकचा स्मोकिंग करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला तिच्याच एका दिवाळी व्हिडिओची आठवण करून देत चांगलंच धारेवर धरलं होती. त्यानंतर आता प्रियांकांचा पती निक जोनसचा एक शर्टलेस फोटो लीक झाला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून सध्या या फोटोमुळे निकला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Manoj Kumar यांनी असं काय केलं ज्यामुळे त्यांचं नावच बदललं गेलं
प्रियांकाच्या 37 व्या वाढदिवसाला अमेरिकेतील मियामी बीचवर एंजॉय करतानाचे अनेक फोटो आतापर्यंत व्हायरल झाले ज्यावरून निक प्रियांकाला ट्रोल करायची एकही संधी नेटीझन्सनी सोडली नाही. नुकताच निकचा एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये निक हँड शॉवर घेताना दिसत आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांनी मात्र या फोटोमध्ये काही वेगळंच पाहिलं आहे. ज्यामुळे त्याला लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या फोटोमधील निकची बॉडी पाहून नेटिझन्सनी त्याला आता तुझं बाबा होण्याचं वय झालं आहे असा टोला लगावला आहे.
सुदैवानं मोठ्या दुर्घटनेतून वाचला दीपिका पदुकोणचा ‘हा’ हिरो
इंग्लिशमध्ये शरीराबाबत अनेक वाक्प्रचार प्रचलित आहेत. जसं की, ‘डॅड बॉड’ याचा अर्थ असा की, वडीलांप्रमाणे दिसणारं शरीर. खरं तर अशा प्रकारच्या बॉडीची कोणतीही व्याख्या नाही. पण लोकांनी निकला त्याच्या बॉडीवरून यासाठी ट्रोल केलं आहे की, या फोटोमध्ये त्याचं पोट दिसत आहे. लोकांचं म्हणणं आहे की, आता निक जोनसची बॉडी त्याला बाबा बनण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे त्यानं आता बाबा बनण्याचा विचार करायला हरकत नाही. असं सर्वांचं म्हणणं आहे.
Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा
काहींनी म्हटलं सिक्स पॅक असं नाही की सर्वांनीच निकला ‘डॅड बॉड’ म्हटलं आहे. काही असेही लोक आहेत ज्यांनी निकची बॉडी सिक्स पॅक म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. अनेक तरुणींनी निकच्या बॉडीचं कौतुक केलं आहे.
निक आणि प्रियांकाचं लग्न झाल्यानंतर प्रियांकाच्या बॉलिवूड सोडण्यामुळे निकवर अनेकदा टीका झाली आहे. हे असं ट्रोलिंग त्याचाच एक भाग आहे. सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या कारणानी त्याला टार्गेट केलं जातं. ============================================================== VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी