मुंबई, 15 डिसेंबर - टीव्ही टाउनची लोकप्रिय दिवा निया शर्मा ( Nia Sharma) पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लुकमुळे चर्चेत आली आहे. निया शर्माने किलर डान्स मूव्हज करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. जर तुम्ही नियाचा हा डान्स अॅक्ट पाहिला नसेल तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल. निया शर्माचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. तिचा हा म्युझिक व्हिडिओ 90 च्या दशकातील हिट डान्स नंबर साथ समंदर पारची रिक्रिएट आवृत्ती आहे. 1992 मध्ये आलेल्या सनी देओल आणि दिव्या भारतीच्या विश्वात्मा चित्रपटातील हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्याची अशी देखील बाजू असू शकते हे कोणास ठाऊक होते. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये निया पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये आणि थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये रेन डान्स करत आहे. निया शर्माच्या बोल्ड लुकप्रमाणेच तिचा डान्सही बोल्ड आहे. निया शर्माचा स्लट्री लुक चाहत्यांना तिचे वेड लावत आहे. 14 डिसेंबरला रिलीज झालेल्या निया शर्माचे हे गाणे खळबळ माजवत आहे. नियाच्या लुक आणि डान्सने चाहते घायाळ करतात. वाचा : Jacqueline Fernandez ला टक्कर देणारी Akshara Singh पुन्हा चर्चेत, पाहा PHOTO निया शर्मासोबत या गाण्यात मिर्झा सात दिसला आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन मुदस्सर खान यांनी केले आहे. निया शर्माच्या या म्युझिक व्हिडिओला केवळ चाहत्यांकडूनच नाही तर सेलिब्रिटींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. निया शर्माच्या व्हिडीओवर कमेंट करताना रुबिना दिलीकने हॉट लिहिले आहे. वाचा - सुशांत सिंह राजपूतचा ‘छिछोरे’ चीनमध्ये होणार रिलीज! जाणून घ्या डिटेल्स
निया शर्मा ही टीव्हीवरील बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. निया शर्मा तिच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त तिच्या ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. निया वेब शो, टीव्ही शो तसेच म्युझिक व्हिडिओमध्येही सक्रिय आहे.