मुंबई, 12 फेब्रुवारी : बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर मागच्या काही काळापासून लग्नाच्या घोषणेमुळे चर्चेत होती. येत्या 14 फेब्रुवारीला नेहा कक्कर आदित्य नारायणशी लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं मात्र नुकतंच आदित्यचे वडील उदित नारायण यांनी या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. पण आता नेहा सोशल मीडियावरील तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिनं तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिचे हे फोटो सध्या सगळीकडे खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील खास गोष्ट अशी की नेहाचे हे सर्व फोटो विनामेकअप आहेत. नेहानं तिच्या सोशल मीडियावर नो मेकअप लुकमधील एक दोन नाही तर चक्क तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘नो फिल्टर’ साराला भरवताना कार्तिक आर्यनचा फोटो VIRAL, कॅप्शन एकदा वाचाच
नेहाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या कमेंट येत आहेत. अनेकांनी नेहाचं कौतुक केलं आहे. कारण कॅमेरासमोर नेहमीच मेकअपमध्ये वावरणाऱ्या अभिनेत्री किंवा गायिका शक्यतो मेकअपशिवाय कॅमेरासमोर येणं टाळतात. नेहा आणि आदित्यच्या लग्नाला आता अवघे 3 दिवस बाकी असताना आदित्यचे वडील उदित नारायण यांनी नेहा त्यांच्या घरची सून होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याच बरोबर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं देखील स्पष्ट केलं. सलमानच्या बॉडीगार्डकडून पोलखोल; BIGG BOSS 13 च्या विजेत्याचं नाव लीक? बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी सांगितलं, नेहा कक्कर आणि आदित्य यांच्या लग्नाच्या चर्चा फक्त अफवा आहेत. हे केवळ इंडियन आयडॉल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलं होतं. कारण या शोमध्ये नेहा जज तर आदित्य होस्ट आहे. आदित्य माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. जर नेहासोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा जर खऱ्या असत्या तर मला नक्की आनंद झाला असता.
उदित जी पुढे म्हणाले, ‘जर काही दिवसात आदित्यचं लग्न असतं तर आम्हाला नक्कीच माहित असतं आणि नेहा खूपच चांगली मुलगी आहे त्यामुळे तिला आमच्या घरची सून म्हणून स्वीकारायला मला नक्कीच आनंद होईल. पण या सर्व गोष्टी केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठी पसरवण्यात आल्या होत्या.’ नेहा आणि आदित्यचं बीच साँग काही कारणानं 10 फेब्रुवारीला रिलीज होऊ शकलं नाही. याची माहिती नेहानं तिच्या इन्स्टाग्रामवरुन देत चाहत्यांची माफी मागितली आहे. BIGG BOSS 13: रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचं काय आहे जुनं कनेक्शन?