JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Navya Naveli Nanda : गली बॉय फेम अभिनेत्याच्या प्रेमात आहे बिग बींची नात? त्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Navya Naveli Nanda : गली बॉय फेम अभिनेत्याच्या प्रेमात आहे बिग बींची नात? त्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या.

जाहिरात

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जून: बॉलिवूड स्टार्ससोबतच त्यांच्या मुलांचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. कधीकधी स्टारकिड्सचे पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. तर कधी-कधी स्टार किड्स वादांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात. याशिवाय स्टार किड्सचे अफेअर्सही चर्चेत असतात. कधी बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत दिसते. तर कधी कधी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचे नाव कोणत्या ना कोणत्या सुंदर अभिनेत्रीसोबत जोडले जाते. तर शाहरुखची मुलं देखील कायमच चर्चेत असतात. या सगळ्या दरम्यान आता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा भलेही फिल्मी दुनियेत दिसणार नसली तरी सोशल मीडियावर तिची खूप चर्चा असते. तिचा साधेपणा चाहत्यांना खूप भावतो. तर यासोबतच तिचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिच्या कामामुळे देखील नव्या नेहमीच चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाही तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. नव्या नवेली नंदाचे नाव बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत बऱ्याच काळापासून जोडले गेले आहे.

अनेक रिपोर्ट्समध्ये हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना अजूनच खतपाणी घालत आहे. या व्हिडिओमध्ये नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी विमानतळावर एकत्र दिसत आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहे. दोघे एकत्र मुंबईत पोहोचले आहेत. Sonalika Joshi: ‘तारक मेहता’ची माधवी खऱ्या आयुष्यात आहे बिझनेस वुमन; कोण आहे अभिनेत्रीचा रिअल लाईफ नवरा? नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा हा पहिला व्हिडिओ नाही, जेव्हा दोघे एकत्र दिसले होते. याआधीही अनेकवेळा नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दोघेही मस्त लूकमध्ये दिसत आहेत. नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी हे दोघे खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

नव्या नवेली नंदा बद्दल सांगायचं झालं तर ती बिग बींची लेक श्वेता बच्चन हिची मुलगी आहे. स्टारकिड असलेल्या नव्याला आई प्रमाणेच अभिनयात काहीरस नाहीये. 25  वर्षीय नव्या सामाजिक संस्थेमध्ये काम करते. एवढंच नाही तर तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी एखाद्या अभिनेत्रीसारखीच नव्या कायम चर्चेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या