JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Nagraj Manjule: नागराज मंजुळेंच्या पत्नी आणि मुलाला पाहिलंय का? दिग्दर्शकाने पहिल्यांदाच आणलं कॅमेऱ्यासमोर

Nagraj Manjule: नागराज मंजुळेंच्या पत्नी आणि मुलाला पाहिलंय का? दिग्दर्शकाने पहिल्यांदाच आणलं कॅमेऱ्यासमोर

Nagraj Manjule Wife: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेंना ओळखलं जातं. या दिग्दर्शकाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिलीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

जाहिरात

नागराज मंजुळे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मार्च- मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळें ना ओळखलं जातं. या दिग्दर्शकाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिलीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चित्रपटांतील साधेपणा, विषयातील गंभीरता आणि मातीतील कलाकार या मिश्रणामुळे त्यांचा सिनेमा प्रेक्षकांना जवळचा वाटतो. नागराज मंजुळे नेहमीच वेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मात्र प्रत्येकजण त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक असतो. त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाबाबत जाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहेत. नागराज मंजुळे नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्याबाबत मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात. परंतु त्यांनी कधीही आपल्या खाजगी आयुष्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीय. त्यांची पत्नी नेमकी कोण आहे? ती कशी दिसते? त्यांना मुलं आहेत का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळत असतात. दरम्यान आता स्वतः नागराज मंजुळेंनी आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलासा करत आपल्या पत्नी आणि मुलाची ओळख करुन दिली आहे. (हे वाचा: Kiran Gaikwad: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड सध्या काय करतो? अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण ) नागराज मंजुळे सध्या आपल्या आगामी ‘घर बंदूक बिर्यानी’ या आगळ्यावेगळ्या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ठिकठिकाणी या सिनेमाचं प्रमोशन सुरु आहे. या एकदा नागराज मंजुळे आणि परश्या अर्थातच आकाश ठोसरची जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेते सयाजी शिंदेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये नागराज मंजुळेंची पत्नी आणि मुलगा पहिल्यांदा सर्वांसमोर आले. स्टेजवर संपूर्ण टीम उपस्थित होती. नागराज मंजुळे कोणी राहिलंय का अशी विचारणा करत होते. दरम्यान आपली पत्नी आणि मुलगा यामध्ये नसल्याचं त्यांना आठवलं. आणि त्यांनी हाक देऊन पत्नी आणि लेकाला बोलावून घेतलं. आणि गार्गी आपली पत्नी असल्याचं सांगतलं.

नागराज यांनी गार्गी कुलकर्णीसोबत लग्न केलं आहे. गार्गी या एक निर्मात्या आहेत. आणि नागराज यांच्या आटपाड प्रोडक्शन हाऊसमध्ये त्या निर्मितीचं काम पाहतात. या दोघांना एक मुलगादेखील आहे. जो आता ‘घर बंदूक बिर्यानी’ मध्ये एका छोट्याश्या भूमिकेत झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या