नागपूर, 06 एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रसार थांंबवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. लॉकडाऊन (Lockdown) सुरू झाल्यानंतर तर सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. पोलीस दिवस रात्र एक करून यासाठी काम करत आहेत. पोलिसांची सोशल मीडिया अकाउंटही यावेळी सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून, गाण्यातून किंवा अगदी वेळ पडल्यास फटके देऊन पोलीस घरीच थांबण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंचं महत्त्व पटवून देत आहेत. (हे वाचा- शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, मेसेज करून मागितली माफी) नागपूर पोलीसही यामध्ये मागे नाही आहेत. नागपूर पोलिसांनी हटके अंदाजात Social Distancing चा सल्ला दिला आहे. नागपूर पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांची मुख्य भूमिका असणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सुद्धा त्यांनी चित्रपटातील डायलॉगचाच वापर केला आहे. (हे वाचा- लॉकडाऊमध्ये काम ठप्प असल्यामुळे 1 लाख मजुरांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन ) यामध्ये नागपूर पोलिसांनी लिहिलं आहे की- ‘Don’t underestimate the power of Social Distancing!’ पोलिसांनी शाहरुखच्या डायलॉगचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला दिला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे असे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गाण्यातून संदेश देताना, लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्याची आरती करताना, वेळ प्रसंगी फटके देताना इ. पण ऑन ड्यूटी असणारा प्रत्येक पोलीस नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवत आहे.
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 4000 पेक्षा जास्त झाली आहे तर 100 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशावेळी जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच एकमेव उपाय कोरोनापासून तुमचा बचाव करू शकतो.