मुंबई 14 जुलै: मराठी मालिकांमध्ये सध्या बालकलाकारांचा मोठा ट्रेंड दिसून येत आहे. अनेक बालकलाकार सध्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे (Myra Vaikul as Pari) मायरा वैकुळ. मायरा सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत परीच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या क्युट अंदाजाने सध्या ती सगळ्यांची आवडती बनली आहे. मायराचा एक ना पाहिलेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चिमुकली मायरा सध्या तिच्या वागण्या बोलण्याच्या अंदाजाने प्रत्येकालाच थक्क करत असते. ही चिमुरडी मुलगी भल्याभल्यांना पुरून उरेल अशी कामगिरी करताना दिसते. मायराचा एक लहानपणीचा (Myra Vaikul childhood photo) फोटो सध्या खूप viral होत आहे. यामध्ये आतापेक्षा सुद्धा छोटुशी गोंडस आणि हसरी मायरा दिसून येत आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत असून तिच्यावर चाहते भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. मायरा सध्या अवघ्या 5 वर्षांची आहे पण भल्याभल्यांना जमणार नाही असा अभिनय ती करताना दिसते. तिचं स्वतःचं इन्स्टाग्राम अकाउंट असून तिला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. तिच्या सोशल मीडियावर ती ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवताना दिसते. अवघ्या पाच वर्षांची असलेली मायरा सध्या एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीये. तिने मागे चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा गाण्यावर केलेल्या नृत्याचा व्हिडिओ तुफान viral झाला होता. आपल्या नाजूक हालचालींनी आणि क्युटनेसने तिने चाहत्यांना भुरळ पाडली होती. सध्या तिच्या कामाचं आणि तिच्या या गोड अंदाजाचं खूप कौतुक होताना दिसत असतं. तिचा हा लहानपणीचा फोटो बघून तिच्या क्युटनेसचं रहस्य नेमकं काय आहे हे चाहत्यांना समजलं आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. या फोटोत दिसणारी ही चिमुकली गोंडस मायरा आज आपल्या गोंडस आणि निरागस अदांनी चाहत्यांना घायाळ करताना दिसत असते.
तिचं स्वतःच युट्युब चॅनल आहे तसंच तिचं इन्स्टाग्राम अकाउंटसुद्धा सक्रिय असतं. थोडक्यात मायरा एखाद्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही हे सध्या दिसून येत आहे. ती सेटवर सुद्धा सगळ्यांची लाडकी असल्याचं पाहायला मिळतं.