शशांक केतकर
मुंबई, 1 ऑक्टोबर : अभिनेता शशांक केतकर नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर विविध विषयावर पोस्ट करत त्याचं मत बिनधास्तपणे मांडत असतो. त्याला चाहत्यांचा देखील चांगलाच प्रतिसाद मिळतो. आता त्याने त्याच्या एका पोस्टद्वारे पुन्हा एकदा महत्वाच्या विषयावर भाष्य करत लक्ष वेधलं आहे. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील अक्षयसुद्धा प्रेक्षकांना तितकाच आवडला. मुरांबा मालिकेतील अक्षय आणि रमाची एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडली. बघता बघता आज या मालिकेने २०० भागांचा टप्पा गाठलाय. त्या निमित्ताने शशांकने खास पोस्ट शेअर करत मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच छोट्या पडद्यावर काम करण्याविषयी देखील त्याने त्याचं मत मांडलं आहे. शशांक केतकरने सोशल मीडियावर मालिकेचं शीर्षकगीत असणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘‘आज मुरंबा या आपल्या मालिकेचे 200 भाग पूर्ण होतायत. शप्पथ हा प्रवास कसा आणि कधी झाला कळलं सुद्धा नाही. संपूर्ण मुरंबा परिवार, स्टार प्रवाह वाहिनी आणि तुम्हा प्रेक्षकांमुळेच हे होऊ शकलं आहे.’’
पुढे टेलिव्हिजनवर काम करण्याविषयी शशांक म्हणतोय कि, ‘‘बर्याचदा आपल्या कडे असं म्हंटल जातं, actors television कडे फक्त एक stepping stone म्हणून बघतात. एखादा Show करायचा आणि मग त्या नंतर फक्त films. माझे विचार थोडे वेगळे आहेत. फिल्म, web series हे करायचच पण म्हणून television ला कधीच दुय्यम लेखू नये. प्रत्येक क्षेत्राची वेगवेगळी chalanges आहेत, rewards आहेत, limitations आहेत…. पण या सगळ्या पेक्षा मोठा आणि महत्त्वाचा आहे प्रेक्षकांशी निर्माण होणारा connect! त्यामुळे यापुढे सुद्धा मी कितीही films केल्या, web series केल्या तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा television करतच राहीन.’’ हेही वाचा - VIDEO: बिग बॉस मराठीच्या ‘त्या’ बोल्ड प्रोमोवर भडकले प्रेक्षक; थेट दिली बॉयकॉटची धमकी या पोस्टमध्ये त्याने आजपर्यंत केलेल्या भूमिका सुपरहिट झाला त्याचं श्रेय स्वतः न घेता मालिकेच्या टीमला दिलं आहे. तो म्हणतोय कि, ‘‘2011 साली मी माझी कारकीर्द सुरू केली आणि या मागच्या 11 वर्षात अनेक back to back super hit shows करता आले ते त्या त्या Show च्या लेखकांमुळे, दिग्दर्शकांमुळे, निर्मात्यांमुळे, वाहिन्या, सह कलाकार, पडद्या मागे काम करणार्या team मुळे आणि प्रेक्षकांमुळेच. आमच्या मुरंबा या मालिकेवर असच प्रेम राहुदे. आम्ही तुमचं असचं मनोरंजन करत राहू.’’
प्रेक्षकांना देखील मुरांबा मालिका चांगलीच आवडते. शशांकच्या या पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. शशांक या मालिकेतून पुन्हा रोमँटिक भूमिकेत दिसला. या मालिकेतील अक्षय रमाला ज्या प्रकारे समजून घेतो, तिला कमी न लेखात तिच्यावर जीवापाड प्रेम करतो ते बघायला प्रेक्षकांना आवडतं. त्यामुळेच मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.