JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानला न्यायालयाचा दणका! NRI शेजाऱ्यासोबतचा वाद पडला महागात

सलमानला न्यायालयाचा दणका! NRI शेजाऱ्यासोबतचा वाद पडला महागात

बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( Salman Khan )च्या अडचणी वाढल्या आहेत. सलमानने NRI शेजारी केतन कक्कर विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मार्च- बॉलिवूड अभिनेता सलमान खान **( Salman Khan )**च्या अडचणी वाढल्या आहेत. सलमानने NRI शेजारी केतन कक्कर विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेत सोशल मीडियावर सलमानशी संबंधित पोस्ट करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. तसेच कक्करने सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस **(Salman Khans defamation case against NRI neighbor at Panvel)**संबंधित केलेल्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्याचीही मागणी केली होती. सलमान खान आणि त्याचा अमेरिका स्थित शेजारी केतन कक्कर यांच्यात प्रॉपर्टीचा वाद आहे. हा वाद विकोपाला गेला असून गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सत्र न्यायाधीश ए एच लद्धड यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन बुधवारी या प्रकरणी आदेश दिले. कक्कर यांच्याकडून आभा सिंह, आदित्य प्रताप यांनी बाजू मांडली. तर सलमानच्या लीगल टीममध्ये पी. डी. गांधी आणि इतर आहेत. या प्रकरणात आता सलमानची याचिका फेटाळल्याने सलमान खानची टीम मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकते. वाचा- ‘मुरांबा’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या कलाकारांचा कोल्हापुरात कल्ला! काय आहे प्रकरण? जमिनीच्या व्यवहारात आपल्या कुटुबियांविरोधात अपमानास्पद टिपण्णी केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. सलमानने मुंबईच्या दिवाणी सत्र न्यायालयात पनवेल येथील फार्म हाऊसजवळील एका जमिनीच्या मालकाविरोधात हा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.  सलमाननं केलेल्या दाव्यानुसार, पनवेल येथील त्याच्या फार्महाऊस जवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कर यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून आपली बदनामी केली आहे. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करावं आणि तात्काळ हटवून टाकावं, असे निर्देश देण्याची विनंतीही सलमाननं या याचिकेतून केली होती. त्यासोबतच सदर व्हिडिओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमाननं प्रतिवादी केले होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या