मुंबई, 28 जुलै- गेली काही दिवस ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटामध्ये नवनवीन प्रयोग करण्यात आले होते. सोबतच ठसकेबाज लावणी आणि सवाल-जवाबने प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारेने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तसेच प्राजक्ता माळी ते मृण्मयी देशपांडेने यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. सोशल मीडियासह बॉक्स ऑफिसवरसुद्धा या चित्रपटाची हवा पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या ‘चंद्रा’ या गाण्यावर अफाट रील्स बनवण्यात आले होते. दरम्यान नुकतंच पार पडलेल्या ‘फक्त मराठी सिने पुरस्कार’मध्ये या चित्रपटाला भरभरुन पुरस्कार मिळाले आहेत. अमृता खानविलकरच नव्हे तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेलासुद्धा पुरस्कार मिळाला आहे. मृण्मयीने या चित्रपटात ‘डॉली’ ची भूमिका साकारली होती. आपल्या बहुगुणी अभिनयाने मृण्मयीने या भूमिकेत जीव ओतला आहे. त्यामुळेच अभिनेत्रीला आज हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मृण्मयीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे.
**(हे वाचा:** PHOTOS: ‘तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर ‘, कुणाच्या प्रेमात पडली प्राजक्ता माळी? ) मृण्मयीने पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आपला फोटो शेअर करत लिहलंय, ‘‘काल ‘फक्त मराठी सिने सन्मान’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हे पारितोषिक मिळालं.. चित्रपट चंद्रमुखी आणि व्यक्तिरेखा डॉली! सगळ्या गडबडीमध्ये हा एकच फोटो घेता आला… 😁 इकडे एक्सप्रेशन कितीही वाईट असलं तरी सिनेमात बरं काम झालं आहे..👻 अजूनही बघितला नसेल तर प्राईम वर नक्की बघा!’’. अभिनेत्रीच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.