JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Adipurushच्या चालू शोमध्ये घुसलं माकडं, प्रभासची एंट्री होताच बघतच राहिलं, Video व्हायरल

Adipurushच्या चालू शोमध्ये घुसलं माकडं, प्रभासची एंट्री होताच बघतच राहिलं, Video व्हायरल

हनुमानरूपी माकड थिएटरमध्ये आदिपुरूष पाहाण्यासाठी आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जाहिरात

आदिपुरूष पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलं माकड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जून : बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा अखेर आज म्हणजेच 16 जून रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे.  सिनेमानं रिलीज आधीच कोटींची कमाई केली आहे. आदिपुरूषचा फर्स्ट डे फर्स्ट शो संपूर्ण देशात झाला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली. थिएटरमध्ये सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्याचप्रमाणे सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक थिएटरमधील एक सीट  भगवान हनुमानासाठी रिकामी सोडण्यात आली आहे.  आदिपुरूष पाहायला गेलेल्या काही प्रेक्षकांनी थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात खरचं हनुमानरूपी माकड थिएटरमध्ये आदिपुरूष पाहाण्यासाठी आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की आदिपुरूषच सिनेमाचा सकाळचा पहिला शो सुरू आहे. स्क्रिनवर प्रभू श्रीरामांच्या रुपात प्रभासची एंट्री झाली आहे आणि अचानक थिएटरच्या एका खिडकीतून एक माकड डोकावून पाहतंय. प्रेक्षकांनी त्या माडकावर लाईट मारून त्याचे व्हिडीओ शुट केलेत. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. हेही वाचा -  Adipurush Meaning : आदिपुरुष कोण आहे? यासाठी होते सत्यनारायण भगवानसोबत पूजा

थिएटरमध्ये आदिपुरूष पाहायला स्वत: बजरंगबीच आला असल्याचं हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनी म्हटलं आहे. थिएटरमध्ये माकडानं एंट्री घेताच उपस्थित प्रेक्षकांनी जय श्रीराम जय श्रीराम हे गाणं म्हणण्यास सुरू केली. गाणं ऐकत खिडकीतील माकड देखील प्रेक्षकांकडे तर कधी स्क्रीनवर दिसत असलेल्या श्रीरामांकडे पाहात होतं.

इतकंच नाही तर हैद्राबादमधील एका थिएटरचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात आदिपुरूषच्या पहिल्या शोच्या आधी प्रेक्षकांनी हनुमानासाठी ठेवलेल्या राखीव खुर्चीवर हनुमानाची प्रतिमा ठेवून त्याचं पूजन केलं आहे. आधी हनुमानाची पूजा आणि नंतर आदिपुरूष थिएटरमध्ये सुरू करण्यात आला. हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. प्रभासचा सिनेमा हिट होईल कारण पहिल्याच दिवशी हनुमानानं एंट्री घेऊन सिनेमाला आशिर्वाद दिल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. प्रेक्षकांनी सिनेमा पाहून आपल्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर शेअर केल्यात. पौराणिक कथा  रामायणावर आधारित आदिपुरूष सिनेमा चांगला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीये. तर काहींनी VFX ओके ओके असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या