JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Leander Paes Kim Sharma: 'या' स्टार खेळाडूच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री; 2 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तुटलं नातं?

Leander Paes Kim Sharma: 'या' स्टार खेळाडूच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री; 2 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तुटलं नातं?

किम शर्मा चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते.गेल्या काही दिवसांपासून तिने टेनिस चॅम्पियन लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. आता मात्र त्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

जाहिरात

किम शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 एप्रिल:  बॉलीवूड अभिनेत्री किम शर्माने तिच्या करिअरमध्ये मोजकेच चित्रपट केले आहेत, पण ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ती एक प्रसिद्ध मॉडेल होती. यानंतर त्याने शाहरुख खानच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. किम शर्मा चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. ‘मोहब्बतें’ फेम ही अभिनेत्री अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि क्रिकेटर्सच्या प्रेमात होती. गेल्या काही दिवसांपासून तिने  टेनिस चॅम्पियन लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. आता मात्र त्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. 2021 या वर्षात  लिएंडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघेही रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या रिलेशनशिपवरुन चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. मात्र आता त्यामध्ये वाद निर्माण झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फेसबुकवर सूर जुळले अन् अभिनेत्रीनं नेपाळच्या सम्राट दहलसोबत बांधली लग्नगाठ, आता एकटीच जगतेय जीवन किम शर्मा आणि लिएंडर पेस यांचं नातं तुटल्याच्या चर्चा सुरु आहेत.  इ टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेलिब्रेटींच्या खाजगी आयुष्यात सगळं काही ठीक नाही. अलीकडेच किम शर्मा अलाना पांडेच्या लग्नात लिएंडर पेसशिवाय पोहोचली होती. इथूनच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण आलं. एवढंच नाही तर 28 मार्चला किम आणि पेस यांच्या रिलेशनशिपची  दुसरी अॅनिव्हर्सरी होती. पण या दोघांनीही एकमेकांसाठी एकही पोस्ट शेअर केली नाही. तसंच अभिनेत्रीने दोघांचे सगळे फोटो सोशल मीडियावरून हटवले आहेत. त्यामुळं त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना अजूनच दुजोरा मिळाला.

संबंधित बातम्या

गेल्या वर्षी म्हणजेच 28 मार्च 2022 मध्ये, लिएंडरने किमवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी  रोमँटिक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती, त्याने लिहिले होते कि, ‘हॅपी अॅनिव्हर्सरी किम. 365 दिवसांच्या आठवणींसाठी आणि दररोज आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद.’ ते किम शर्माही दोघांचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. गेल्या वर्षी अशीही चर्चा झाली होती की दोघेही कोर्ट मॅरेज करणार आहेत पण त्या फक्त अफवा होत्या. आता या जोडप्याचं नातं तुटल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी लिएंडर पेस रिया पिल्लईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. 2000 मध्ये त्यांनी लग्न केले. 2005 मध्ये या जोडप्याने मुलगी अयानाला जन्म दिला. 2014 मध्ये रिया पिल्लईनेही पेसविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, ‘मोहब्बतें’मधून पदार्पण करणारी किम यापूर्वी अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत होती. तसेच त्याआधी तिचे नाव युवराज सिंग, अमित साध यांच्यासोबत देखील जोडलं गेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या