JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: वय वगैरे काय हो! 83 व्या वर्षीही मिलिंद सोमणची आई देतेय Fitness Goals, 25 वर्षांनी केली ही गोष्ट

VIDEO: वय वगैरे काय हो! 83 व्या वर्षीही मिलिंद सोमणची आई देतेय Fitness Goals, 25 वर्षांनी केली ही गोष्ट

मिलिंद सोमणची आई उषा सोमण या देखील फिटनेस गोल्स देतात. धावताना, योगा करताना असे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी वयाच्या 83 वर्षी देखील आणखी एक थक्क करणारी गोष्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च: मिलिंद सोमण (Milind Soman Fitness) हा मराठमोळा अभिनेता त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या 56 व्या वर्षीही त्याने स्वत:ला मेंटेन ठेवलं आहे, इतकं की त्याच्या फिटनेस आणि एनर्जीपुढे तरुणही लाजतील. पण याठिकाणी आपण मॉडेल आणि अभिनेता मिलिंदबद्दल नाही तर त्याच्या आईबद्दल (Milind Soman Mother Usha Soman) बोलत आहोत. मिलिंद सोमणची आई उषा सोमण या देखील फिटनेस गोल्स देतात. धावताना, योगा करताना असे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन नक्कीच कुणाचा विश्वास बसणार नाही की त्यांचे वय 83 आहे. आता उषा सोमण यांनी या वयात आणखी एक थक्क करणारी गोष्ट केली आहे. 25 वर्षांनंतर त्यांनी बीचवर सायकलिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मिलिंदने त्याच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो काहीच वेळात व्हायरल झाला आहे. उषा सोमण यांची फिटनेस जर्नी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. असं म्हणतात की आई ही मुलांची पहिली शाळा असते. मिलिंद सोमणच्या आईला पाहिल्यानंतर या गोष्टीवर तुमचाही ठाम विश्वास बसेल. मिलिंद त्याच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असतो, पण त्याची आई देखील वयाच्या 83 व्या वर्षी सर्वांना चकित करत आहे. मिलिंदने त्याची आई उषा सोमण यांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंदची आई पूर्ण उत्साहात समुद्रकिनाऱ्यावर सायकल चालवत आहे. हे वाचा- मराठमोळ्या संदीप पाठकचा विदेशात डंका, ‘राख’साठी पटकावला International Award मिलिंद सोमणने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना असं कॅप्शन दिलं आहे की, ‘जवळपास 25 वर्षांनंतर आई सायकलिंग करत आहे. तुम्हाला जी गोष्ट आवडते ती करत राहा आणि नियमित त्याचा सराव करत राहा. 83 वय असताना हे नक्कीच वाईट नाही आहे.’

संबंधित बातम्या

मिंलिंद सोमणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मिलिंदच्या आईला अनेकांनी Inspiration म्हटलं आहे, तर काहींनी पॉवरफुल लेडी म्हटलं आहे. पण यामध्येही लक्ष वेधणारी कमेंट ठरली ती उषा यांच्या सुनबाईंची, अर्थात मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर हिची. तिने ‘My Cuties’ अशी कमेंट केली आहे. अंकिता देखील फिटनेसवर विशेष लक्ष देणाऱ्यांपैकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या