JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही', तनुश्री दत्ता पुन्हा भडकली

'अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही', तनुश्री दत्ता पुन्हा भडकली

नाना पाटेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप करत तनुश्रीनं सिनेजगतात खळबळ उडवून दिली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये Me Too चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता एका खळबळजनक विधाननं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाना पाटेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप करत तनुश्रीनं सिने जगतात खळबळ उडवून दिली होती. मात्र पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लिन चीट देत त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर काही दिवसांसाठी तनुश्री अमेरिकेला गेली होती. पण तिथून परत आल्यावर तिनं पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेरिकेहून भारतात परतलेल्या तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याविषयी पुन्हा संताप व्यक्त केला. यावेळी अभिनेत्री होण्यासाठी मी कोणासोबत अय्याशी केली नाही, असं म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी तिने MeToo मोहीम, स्त्रीवाद याविषयी चर्चा केली. Bigg Boss 13 : फिनालेच्या काही तास आधीच पैसे घेऊन आसिम रियाजनं सोडला शो? २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीने केला होता. त्यानंतर कालाविश्वात MeToo मोहिमेचं वादळ सुरु झालं होतं. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर पुन्हा एकदा तनुश्रीने याविषयी तिचं मत मांडलं आहे.

या मुलाखतीत बोलताना तनुश्री म्हणाली, ‘नाना पाटेकर यांच्यावर मी Me Too मोहिमेअंतर्गत आवाज उठवल्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी मला पाठिंबा दिला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माझं समर्थन केलं. मात्र ट्वीट करुन परिस्थिती बदलत नाही. ज्यावेळी या अभिनेत्रींच्या ओळखीच्या दिग्दर्शकांचं नाव MeToo मोहिमेमध्ये आलं त्याचवेळी या अभिनेत्रींनी माझ्याकडे पाठ फिरवली.’ … आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे आले भरून!

तनुश्री पुढे म्हणाली, ‘मी नाना पाटेकर यांना कधीही माफ करु शकत नाही. त्यांच्यामुळे माझं पूर्ण करिअर उद्धवस्त झालं. मोठ्या मेहनतीने मी माझं करिअर घडवलं होतं. कधीही कामासाठी कोणाच्या मागे पुढे केलं नव्हतं. कधीही कामासाठी कोणाची हाजी-हाजी केली नव्हती. तसेच अभिनेत्री होण्यासीठी मी कोणसोबत अय्याशी केली नव्हती. मी जे काही केलं ते माझ्या स्वतःच्या हिंमतीवर उभं केलं होतं. मात्र नाना पाटेकर यांच्यामुळे माझं करिअर उद्वधस्त झालं. त्यांच्या सारख्या लोकांनी माझं मानसिक खच्चीकरण केलं’. व्हॅलेंटाइन डेला मलायका अरोरानं शेअर केला VIDEO, हे खास काम करण्याचा दिला सल्ला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या