आर्ची फेम रिंकू राजगुरू ज्योतिबा चरणी
मुंबई, 20 एप्रिल- सैराट फेम आर्ची म्हणजे सर्वांची लाडकी रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे रिंकू देखील सोशल मीडियावर तिचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. नुकतचं रिंकून कोल्हापूर जवळच्या डोंगरच्या ज्योतिबाचं दर्शन घेतलं. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या डोंगरच्या ज्योतिबाचं अभिनेत्री रिंकू राजगुरूनं दर्शन घेतलं आहे. तिनं नुकताच इन्स्टावर या दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रिंकूची आई दिसत आहे. रिंकून हात जोडून देवाला साकडं घालताना दिसत आहे. रिंकू यावेळी गुलालत न्हाहून गेल्याचं दिसून येत आहे. चाहत्यांनी देखील कमेंट करत रिंकूचं कोल्हापूरमध्ये स्वागत केलं आहे. तसेच तिला आगामी प्रोजक्टसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. वाचा- मृणाल कुलकर्णींनी चक्क खाल्लेत तळलेले कीडे; सांगितलं कशी आहे त्याची चव नुकतीच ज्योतिबाची यात्रा झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टया लागताच भाविक देवदर्शनासाठी गर्दी करताना दिसतात.मध्यंतरी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं देखील ज्योतिबाचं दर्शन घेतलं होतं. आता प्राजक्ता नंतर अभिनेत्री रिंकूनं देखील दर्शन घेतलं आहे.
रिंकू राजगुरूचा जन्म सोलापूरमधील अकलुज याठिकाणी झाला आहे. तिचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. परंतु तिला रिंकूच म्हटलं जातं. रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. रिंकूने मराठीसोबत हिंदीमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे मेकअप, कागर आणि अलिकडेच आलेला ‘झुंड’ हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले.
सध्या रिंकू आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. आधीमध्ये ती फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्रीने फारच कमी काळात स्वतःमध्ये मोठा बदल केला आहे. रिंकूचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क होतात. ती आधीपेक्षा जास्त स्लिम आणि फिट झाली आहे.