JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / TRP साठी वाटेल ते...! वटपौर्णिमेला बायकोला उचलून घेण्याता मालिकेच्या हिरोची लागेलय रेस

TRP साठी वाटेल ते...! वटपौर्णिमेला बायकोला उचलून घेण्याता मालिकेच्या हिरोची लागेलय रेस

मराठी मालिकांमध्ये (Marathi Serails) काय घडत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुर असतात. अनेक मराठी मालिकांचा चाहतावर्ग सुद्धा खूप मोठा आहे. असं असूनही मात्र काही मालिकांच्या कथनकावरून सध्या प्रेक्षक नाखूष आहेत का असा प्रश्न पडत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 जून: आजकाल टीआरपी साठी काहीपण असा अंदाज सगळ्या (Marathi Serials) मराठी मालिकांमध्ये पाहायला मिळतो. प्रेक्षकांना जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी प्रत्येक वाहिनी झटून काम करत असते. त्यामुळे अनेकदा प्रेक्षकांचं मनोरंजन होण्याऐवजी आतर्क्य गोष्टी पाहायला मिळतात किंवा त्याच त्या कल्पनांवर मालिकांचा ट्रॅक चालताना दिसतो. असाच काहीसा घिसापीटा प्रकार अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सगळ्या मालिकांमध्ये वटपौर्णिमेला धरून कथानक सुरु आहे. अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये मुख्य स्त्री पात्र वडाळा फेऱ्या मारून सात जन्म तोच पती मिळावा म्हणून पूजा करताना दिसणार आहेत. यासाठी खास डिजाईन केलेले अभिनेत्रींचे लुक सुद्धा viral होत आहेत. पण अजूनही प्रेक्षकांना हवं तसं मनोरंजन मात्र मिळत नाहीये. याला कारण आहे बऱ्याचशा मालिकांमध्ये चालणारं सेम कथानक. आता वटपौर्णिमा जवळ आलीये म्हणल्यावर सगळ्या मालिकांमध्ये लगबग होताना दिसत आहे. कुठे हिरोचं हिरोईनशी वाकड आहे तर कुठे हिरो हिरोईनच नुकतंच लग्न झालं असल्याने पहिली वटपौर्णिमा साजरी होताना दिसणार आहे. असं जरी असलं तरी मालिकेतील प्रमुख स्त्री पात्राच्या पायाला अचानक झालेली दुखापत आणि प्रमुख पुरुष अभिनेत्याने तिला उचलून घेऊन वडाला सात फेऱ्या मारणं हा ट्रेंड बऱ्याच मालिकांमध्ये पाहायला मिळतो आहे. त्यामुळे ज्या त्या मालिकांमध्ये हिरोईन ठेचकळताना दिसत आहे तर हिरो तिला उचलून घेऊन वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करताना दिसत आहे. ज्या त्या मालिकेत बायकोला पहिले कोण उचलून घेतो यासाठी जणू हिरोची रेस लागली आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो आहे.

हा सगळं खटाटोप कशाला तर टीआरपी साठी. कोणत्या मालिकेला किती टीआरपी यावर सगळी गणितं अवलंबून असतात. सण आणि समारंभ म्हणलं की मालिकांमध्ये नवे ट्रेंड्स उगवताना दिसतात. त्यामुळे कधीकधी सणांचं खरोखर असलेलं महत्त्व दूर राहतं आणि टीआरपीच्या रेसमध्ये प्रेक्षकांना तेच ते पाहावं लागत आणि याचा परिणाम म्हणजे होणार मनोरंजन सुद्धा बाजूला राहतं.

यावेळी सुद्धा टीआरपीसाठी चाललेली ही धडपड मात्र मनोरंजनात कपात आणते का अशी भीती प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हे ही वाचा-  ‘मोठा नको होऊ…’; मृण्मयी देशपांडेने सिद्धार्थ चांदेकरच्या बर्थडेला शेअर केला भन्नाट PHOTO अनेक वाहिन्या सॅन आणि समारंभ किंवा मालिकेतील काही महत्त्वाचे टप्पे असताना महाएपिसोडचं आयोजन करतात. एरवीपेक्षा जास्त वेळ असणाऱ्या या एपिसोडमध्ये सुद्धा हल्ली पूर्वीसारखी मजा राहिली नाही अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येताना दिसत आहे. एकूणच काय तर फक्त टीआरपीच्या नावाखाली प्रेक्षकांना तेच ते पाहायला लागू नये एवढीच त्यांची इच्छा आहे हे समजतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या