JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BB15: विश्वसुंदरीसोबत फ्लर्ट करण्याच्या नादात अभिजित बिचुकलेचा झाला मोठा पचका

BB15: विश्वसुंदरीसोबत फ्लर्ट करण्याच्या नादात अभिजित बिचुकलेचा झाला मोठा पचका

अभिजित बिचुकलेने बिग बॉसच्या घरात विश्वसुंदरीसाठी गाणे गायले व मग काय बिचुकलेने थेट विश्वसुंदरीसोबत रोमान्स सुरू केला.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 डिसेंबर- बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या घरात एंट्री करण्यापूर्वी अभिजित बिचुकले ( abhijeet bichukale ) खूप मोठं बोलत होता. पण शोमध्ये आल्यानंतर त्याच हे बोलणं देखील मागे पढले आहे आणि तो सर्वात कमकुवत स्पर्धक दिसत आहेत. अभिजीत एकतर घरातील प्रत्येक गोष्टीवर गाणी म्हणत राहतो किंवा कुठल्यातरी कोपऱ्यात बसून घरातील सदस्यांची निवांत भांडणे पाहतो. जेव्हा बिचुकलेच्या गाण्यांना कोणी महत्त्व दिले नाही, तेव्हा त्याने विश्वसुंदरीसाठी गाणे गायले. मग काय बिचुकलेने थेट विश्वसुंदरीसोबत रोमान्स सुरू केला. विश्वसुंदरी देखील बिचुकलेचे गाणे ऐकुन गायब झाली. बहुदा तिला देखील बिचुकलेचे गाणे आवडलेले दिसत नाही. अभिजितने विश्वसुंदरीसाठी गायले गाणे शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विश्वसुंदरी अभिजितशी बोलत आहे आणि त्याला तिची स्तुती करण्यास सांगते. पण त्या बदल्यात अभिजीत विश्वसुंदरीसाठी गाणी म्हणू लागतो . साथिया तूने क्या किया… हे गाणे अभिजितच्या विश्वसुंदरीसाठी गातो. मात्र मध्येच काय होत माहिती नाही विश्वसुंदरी स्वतःच गायब होते. वाचा : ‘एकदम भंगार विनोद’; ‘हे तर काहीच नाय’ म्हणणाऱ्या झीच्या नव्या शोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली गाणे गायल्यानंतर अभिजित विश्वसुंदरीला सांगतो की, तुम्हाला वाटले तर मी बिग बॉसचा विजेता बनू शकतो. यानंतर अभिजीत हॅलो करत राहतो.. आणि विश्वसुंदरी काहीच उत्तर देत नाही. बहुतेक विश्वसुंदरीला बिचुकलेचे गाण आवडले नसावे.

संबंधित बातम्या

राखी सावंत आणि प्रतीकने अभिजितला विश्वसुंदरीसोबत फ्लर्ट करताना पाहून त्याची खिल्ली उडवली. प्रतिक म्हणाला- हॅलो..हॅलो काय करतोयस… त्यांनी ठेवलं असेल. यानंतर, राखी आणि प्रतीक त्याची खिल्ली उडवतात. प्रतिक म्हणतो की, त्यांचा नंबर तरी घ्यायचा. एक तरी काम नीट करायाचे असे म्हणून राखी सावंत अभिजित बिचुकलेला डिवचते. आता अभिजीत बिग बॉसच्या घरात फक्त विश्वसुंदरीसोबतच फ्लर्ट करत राहणार की गेममध्येही सक्रिय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या