JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Titeeksha Tawde: 'ज्ञानेश्वर माउली' फेम अभिनेत्री घेतेय तुफानी वेगात विकेट, हा खास video पाहा

Titeeksha Tawde: 'ज्ञानेश्वर माउली' फेम अभिनेत्री घेतेय तुफानी वेगात विकेट, हा खास video पाहा

सोनी मराठीवरील मालिकेत संत कान्होपात्रा (dnyaneshwar mauli sant kanhopatra) भूमिका साकारणाऱ्या तितिक्षाचा (titiksha tawde) हा कमाल अंदाज पाहिलात का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जुलै: अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) येत्या काळात एका मोठ्या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. तितिक्षा तावडे या मराठी अभिनेत्रीचा चेहरा थेट तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिठू’ (Titeeksha Tawde in Shabhash Mithu) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तितिक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास विडिओ शेअर करत आपला तुफानी अंदाज दाखवून दिला आहे. तितिक्षाने शूटिंग सुरु होण्याआधी तापसी पन्नूसोबतचा एक खास फोटो सुद्धा शेअर केला होता. सध्या तितिक्षाने शेअर केलेला व्हिडिओ लक्षवेधी ठरत आहे. तितिक्षा या व्हिडीओमध्ये तुफानी अंदाजात बॉलिंग करताना दिसत आहे. या खास इन्स्टाग्राम रीलमध्ये तिने या भूमिकेसाठी कशी तयारी केली हे दिसून येत आहे. एकदम वेगवान अंदाजात तितिक्षा बॉलिंग करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांनी तितिक्षाच्या या अंदाजाचं खूप कौतुक केलं आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी सुद्धा तिला या फिल्मसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे. सध्या तितिक्षा ‘ज्ञानेश्वर माउली’ (Dnyaneshwar Mauli) या सोनी मराठीवरील मालिकेत संत कान्होपात्रा (Titeeksha Tawde as kanhopatra) ही भूमिका साकारताना दिसत आहे. हरी नामाच्या गजरात तल्लीन होणारी गोड स्वभावाची हसतमुख कान्होपात्रा प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसत आहे. हे ही वाचा-  Leg exercise करुन रितेश देशमुखचं झालं असं काही की आता चालणंही झालं मुश्किल! या मालिकेत तिचा गोड साधा पण मोहक लुक दिसून येत आहे. मालिकेत लवकरच कान्होपात्रा आणि ज्ञानेश्वर यांची भेट सुद्धा होईल असं दिसून येत आहे. सध्या या मालिकेत संतांची मांदियाळी दिसून येत आहे. संत कान्होपात्रा यांचा ट्रॅक फार पसंत केला जात आहे.

एकीकडे कान्होपात्रा सारखं गोड स्वभावाचं पात्र तर एकीकडे शाबाश मिठू मधील वेगळ्या धाटणीचं पात्र अशा दोन्ही भूमिका तितिक्षा लीलया पेलताना दिसत आहे. यातूनच तिच्या अभिनय कौशल्याची कमाल पाहायला मिळत आहे.

तितिक्षाने शाबाश मिठू मधील भूमिकेसाठी बरेच कष्ट आणि मेहनत घेतल्याचं समोर येत आहे. तिचे प्रॅक्टिस कर्तनासागे अनेक bts विडिओ तिने शेअर केले आहेत. सध्या चाहते तिची या बॉलिवूड सिनेमातील भूमिका पाहायला उत्सुक झाले आहेत. ‘शाबाश मिठू’ हा सिनेमा येत्या 15 जुलै ला प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या