JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / श्रुती मराठे नवऱ्याला प्रेमानं या नावाने मारते हाक, बर्थडे पोस्टमुळं झाला खुलासा

श्रुती मराठे नवऱ्याला प्रेमानं या नावाने मारते हाक, बर्थडे पोस्टमुळं झाला खुलासा

अभिनेत्री श्रुती मराठे ( Shrutii Marrathe ) हिनं नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून ती नवऱ्याला प्रेमानं घरात कोणत्या नावानं हाक मारते याचा खुलासा झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे- अभिनेत्री श्रुती मराठे (  Shrutii Marrathe ) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवास तिच्या नवऱ्यासोबत देखील ती काही भन्नट रील्स शेअर करत असते. आज तिनं नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय त्याच्यासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. कारण देखील खास आहे, श्रुती मराठेचा नवरा अभिनेता गौरव घाटणेकरचा ( gaurav ghatnekar birthday ) आज वाढदिवस आहे. गौरवसोबतचा व्हिडिओ शेअर करत तिनं त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या निमित्ताने आज श्रुती मराठे गौरवला प्रेमानं कोणत्या नावानं बोलवते याचा खुलासा झाला आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गिगो…..तुझ्याबरोबर वेडेपणा करताना एक वेगळीच लेव्हल असते ! आणखी अशाच आनंददायी आठवणी बनवत राहू . ❤️ तुला आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी मिळो हीच सदिच्छा…!! वाचा- शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं केतकी चितळेला भोवलं, थेट पोलीस कोठडीत रवानगी श्रुती गौरवला प्रेमानं गिगो…..म्हणत असल्याचे यातून स्पष्ट झालं आहे. श्रुती मराठेच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांच्याच मैत्री झाली. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.ॉ

संबंधित बातम्या

गौरवने अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या उत्तम आणि प्रभावशाली अभिनयासाठी त्याला ओळखले जाते. त्याच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गौरवने व्हिसलिंग वुड्स या संस्थतेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिथे त्याला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहाच्या हाताखाली अभिनय शिकता आला. त्यानंतर त्याने नाटकांपासून त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली. ‘तुझविण सख्या रे’ मालिकेतून त्याने टीव्ही विश्वात डेब्यू केला. या मालिकेमुळं तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. वाचा- ‘जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या दोन अभिनेत्री..‘किरण मानेंची पोस्ट श्रुती मराठेने मालिकांसह सिनेमात काम केलं आहे. तिच्या हटके फोटोशूटमुळे ती नेहमीच चर्चेत असते.श्रुती मराठेने 2009 मध्ये आलेल्या ‘सनई चौघडे’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केले. तर इंदिरा विजहा या सिनेमातून तिने साऊथमध्ये एंट्री घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या