मुंबई, 2 मार्च- म राठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठीप्रमाणे तिनं बॉलिवूडमध्ये देखील आपले स्थान निर्माण केले आहे. सईला मिमी या चित्रपटासाठी आयफा, फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनयाच्या बरोबरीने ती फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी तिच्या या फोटोशूटचं कौतुक देखील केलं आहे. ट्रोल केल्यानंतर सईनं देखील ट्रोर्लसना देखील चांगलेच उत्तर दिलं आहे. सई ताम्हणकरनं नुकतेच पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमधले तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा ट्रेडिशनल लूक आहे. केसांचा सुंदर बन,त्यातनं चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या बटा, लोंबते कानातले अन् माथ्यावर छोटीशी बिंदी…असा एकंदरीत सईचा लूक आहे. ती नेहमीप्राणे सुंदर दिसत आहे. पण काही नेटकऱ्यांना तिचा लूक भावलेला दिसत नाही म्हणून त्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केलं. वाचा- वीणा जगतापने दिली Good News; शिवच्या एक्स-गर्लफ्रेंडवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करते. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळं ती ट्रोल होत आहे.
सई ज्या फोटोंमुळं ट्रोल होत आहेत ते तिन्ह पांढऱ्या रंगाच्या भिंतीच्या बॅकग्राऊंडला काढले आहेत. सईच्या या फोटोंवर विविध कमेंट केल्या आहेत. सई ताम्हणकरच्या त्या फोटोंना ट्रोल करताना एकानं म्हटलंय, ‘बाकी सगळं ठीक आहे पण काहीतरी मिसिंग आहे तरीही..’ तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, ‘कोंबडी दिसतेयस आज’, तर आणखी एकानं म्हटलंय की, ‘पडदा आणि ड्रेस एक सारखाच वाटतोय बरं का सई…’
सईनं देखील या ट्रोलर्संना तिच्या शब्दात सुनावलं आहे. ती म्हणालीय, ‘होय अगदीच खरंय..याला म्हणतात टोन ऑन टोन….’ म्हणजे एकाच रंगाचे शेड एकावर एक लावणे..असा पलटवार करत सईनं ट्रोलरची बोलतीच बंद केली आहे. सध्या सईच्या फोटोशूट इतकचं तिचं उत्तर देखील चर्चेत आहे. सई अनेकदा ट्रोलर्संना उत्तर देताना दिसते.