JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / लॉकडाऊनमध्ये रसिका सुनीलनं केलं BOLD फोटोशूट, हॉट लुकवर चाहते फिदा

लॉकडाऊनमध्ये रसिका सुनीलनं केलं BOLD फोटोशूट, हॉट लुकवर चाहते फिदा

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी इमेज असलेल्या रसिकानं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जून : मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. मराठी इंडस्ट्रीतली बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रसिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये साकारलेल्या शनायाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली मात्र काही दिवसांनी तिनं ही मालिका सोडली आणि तिची जागा इशा केसकरनं घेतली. मात्र रसिकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेलं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. त्यामुळेच की काय तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल होताना दिसत असतात. रसिकानं काही नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी इमेज असलेल्या रसिकानं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये रसिका तिच्या कुटुंबासोबत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. शिल्पासाठी अक्षय कुमारनं रवीनाला सोडलं, पण असं काय झालं की त्यांचं लग्न मोडलं

रसिकानं काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामुळे तिची खूप चर्चा झाली होती. तिच्या मादक अदांवर चाहते घायाळ झाले होते. आताही तिचे हे फोटो असेच सोशल मीडियावर आकर्षणचा विषय ठरले आहेत. या फोटोंत ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये रसिका खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात

रसिकानं ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील नखखट शनाया साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण अचानक तिनं यातून ब्रेक घेतला आणि ती पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली होती. पण आता ती भारतात परतली आहे. मात्र सध्या तिच्याकडे कोणते नवे प्रोजेक्ट आहेत किंवा ती पुन्हा अभिनयाकडे वळणार की नाही याबाबत तिनं कोणतीही हिंट दिलेली नाही. मात्र तिचे चाहते तिला पुन्हा अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत हे मात्र नक्की. लॉकडाऊनने घेतला अभिनेता-अभिनेत्रीचा जीव, शूटिंग बंद झाल्याने केली आत्महत्या Covid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या