मुंबई, 21 मार्च- अभिनेत्री पूजा सावंत ( pooja sawant) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय ती तिच्या कामाच्या अपडेट देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. पूजानं**( pooja sawant latest video)** नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिनं म्हटलं आहे की, खूप वर्षाचे स्वप्न आज पूर्ण झालं आहे. पूजा सावंत अभिनयासोबत एक उत्तम डान्सर ( pooja sawant latest dance video) देखील आहे. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या शोच्या परीक्षका म्हणून पूजा सावंतने काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तिचे डान्स व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. नुकताच तिनं तिच्या एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पूजा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, माझं लहानपणासून या गाण्यावर डान्स करण्याचे स्वप्न होते…झी महागौरवच्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण झाले , तमाम मराठी चित्रपटसृष्टीकडून गानसरस्वती लता मंगेशकर यांना मानवंदना देताना माझा छोटासा खारीचा वाटा 🙏 झी महागौरव २०२२ रविवार २७ मार्च, संध्या ७ वाजता….अशी तिनं पोस्ट केली आहे. वाचा- ‘तू तेव्हा तशी’ मालिकेचा पहिला भाग पाहून नेटकरी म्हणाले, शिल्पा सुंदर पण… पूजाने झी महागौरव २०२२ साठी जिया जले जान जले…या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर डान्स करण्याचे तिचं स्वप्न होते. झी महागौरवमुळे तिचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. या गाण्यावर पूजा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांनी देखील तिच्या डान्सचे कौतुक केले आहे.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.यानंतर ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.