मुंबई,14 जून- मराठीतील सर्वात क्युट कपल म्हणून मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर (Mitali mayekar & Sidharth Chandekar) यांना ओळखलं जातं. या दोघांच्या जोडीला चाहते भरभरून प्रेम देत असतात. म्हणूनच चाहत्यांना त्यांच्याबद्दल प्रत्येक अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं.आज सिद्धार्थ (Sidharth Chandekar Birthday) आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकरने एक सुंदर पोस्ट शेअर करत पती सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय लिहिलंय. मिताली मयेकर पोस्ट- मितालीने मजेशीर आणि तितकीच रोमँटिक पोस्ट लिहीत म्हटलंय, ‘‘आपण त्याच्या प्रेमात का पडलो? याची प्रथम आठवण करा. जीएसटी कसा भरायचा हे त्याला माहीत होते म्हणून?की तो अप्रतिम खिचडी बनवतो म्हणून?की तो स्वयंपाकघर स्वच्छ सोडतो म्हणून? कि तो डिनर डेट प्लॅन करतो म्हणून? यात चुकीचं नाही.. पण मी त्याच्या प्रेमात पडले कारण,त्याने मला नव्या साहसी जगाचं वचन दिलं. कारण आम्हाला एकच म्युझिक पसंत आहे(आम्ही प्रयत्न करतो). आम्ही विक्षिप्त होतो आणि आजही आहोत. कारण आम्ही सुंदर लोक नाही. कारण तो माझा जॅक पर्सन आहे(मी खूप प्रयत्न करतेय त्याच्यासाठी योग्य रिबेका बनण्यासाठी)’.
अभिनेत्रीने पुढं लिहिलंय, ‘कारण त्याने मला पहिल्यांदाच स्वतंत्र असल्याची जाणीव करुन दिली. मी त्याच्या नजरेत स्वतःला ओळखलं. तो माझा जिवलग मित्र आहे. आणि एखाद्या पुण्याच्या मुलासाठी मुंबईच्या मुलीला भेटणं कितीही अशक्य असलं.तरी मला माझ्या जोडीदाराला भेटून आत्मा प्रज्वलित करणारी एखादी ठिणगी मिळाल्यासारखं वाटलं. पाच वर्षानंतर हे सर्व मोजमाप असताना ते कधीकधी हरवल्यासारखं वाटतं. सिद्धार्थ तू माझ्यासाठी अजूनही एक स्वप्नातील व्यक्ती आहेस. माझ्याशी लग्न झाल्याची वास्तविकता काहीवेळा जरा जास्तच बिघडते. मी तुझ्यासाठी उत्तम आणि उत्तम बनण्याचा प्रयत्न करेन’. (हे वाचा: Siddharth Chandekar Bday Special: मिश्किल आणि गोड स्वभावाच्या सिद्धार्थचं बालपण होतं खडतर **)** मितालीने सिद्धार्थसाठी ही खास पोस्ट लिहीत एक सुंदर फोटोसुद्धा शेअर केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड पसंत केली जात आहे. मितालीच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सहकलाकार मित्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत ते आपल्या चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतात. चाहतेही त्यांच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात.सध्या हे दोघेही लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहेत. त्यामुळे लंडनमध्येच मिताली सिद्धार्थचा वाढदिवस साजरा करत आहे.