JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे...' मानसी नाईकची पोस्ट नेमक कुणासाठी?

'पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे...' मानसी नाईकची पोस्ट नेमक कुणासाठी?

बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सध्या ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च- बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. नवरा प्रदीप खरेरा **(mansi naik and pradip kharera )**याच्यासोबतचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. विशेष करून मानसी तिच्या नृत्याच्या कलेने सर्वांचे लक्षवेधून घेत असते. तिचे डान्स व्हिडिओ चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी असतात. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.सध्या ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मानसी नाईकने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र या फोटोसोबत तिच्या कॅप्शनची देखील जोरदार चर्चा होत आहे. तिनं म्हटलं आहे की, न मैं गिरा, और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे… अशी पोस्ट मानसीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्ट पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे क, नेमकी कुणाला उद्देशुन तिनं ही पोस्ट लिहिली आहे. याशिवाय काहींने तिचे कौतुक देखील केलं आहे. वाचा- वहिनीसाहेबांच्या वर्कआऊटची चाहत्यांना काळजी, म्हणाले, आहो जरा सांभाळून मानसीने नुकताच होळीनिमित्त तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायर होत आहे. तिच्या अदा घायाळ करणाऱ्या अशाच आहेत. चाहते तिच्या या अदांवार फिदा झालेले दिसत आहेत. मानसी नाईकने बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. दोघेही सोशल मीडियावर विविध फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

संबंधित बातम्या

मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या