मुंबई, 16 मे- ketki chitale controversy : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Actress Ketki Chitale) अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (NCP President Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणं केतकीला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनी तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मानसी नाईक हिनं देखील केतकी चितळेच्या अशा वागण्याचा निषेध व्यक्त करत कठोरतील कठोर शिक्षा कऱण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री मानसी नाईकनं माध्यमांशी बोलताना केतकी चितळेकडून शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट वरून नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कारण आपण मराठी आहोत आणि मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद आहे. शरद पवार हे खूप मोठं नाव आहे, देशातच नाही तर देशाबाहेर देखील त्यांचं नाव आहे. त्यामुळं अशा व्यक्तीबद्दल बोलणं योग्य नाही. असं बोलताना एकदा नाही तर दोनदा विचार करण्याची गरज आहे. वडिलधाऱ्या व्यक्तीबद्दल देखील बोलू नये. त्यामुळं आशा पोस्ट करणाऱ्यांवर कठोरतील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील मानसी नाईकने यावेळी केली. वाचा- श्रुती मराठे नवऱ्याला प्रेमानं या नावाने मारते हाक, बर्थडे पोस्टमुळं झाला खुलासा केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.