क्रांतीनं शेअर केला आईच्या हातच्या जेवणाचा खास VIDEO
मुंबई, 12 एप्रिल- ‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. क्रांती रेडकरला खाण्याची आवड किती आहे…हे सर्वांना माहिती आहे.अनेकदा ती जेवणाचे व्हिडिओ शेअर करत असते. मध्यंतरी तिनं असाच एक नागपूर स्पेशल सावजी मटण खाताना एक व्हिडिओ शेअर केला होता. सावजी मटण खाऊन तिची जी अवस्था झाली होती..ती पाहण्यालायक होती. आता तिनं असाच एक जेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. क्रांती रेडकरनं नुकताच तिच्या इन्स्टावार जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खास आहे कारण तिच्या आईनं हे जेवण बनवलं आहे. साधा पांढरा भात आणि साधी आमटी आणी पापड असं साध जेवण आहे..पण शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचं ना..क्रांतीनं देखील याला एक सुंदर कॅप्शन दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, तुम्ही जग फिरलं..कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जेवला तरी आईच्या हातच्या जेवणाची सर..चव जगात कशालाच येत नाही. हे जेवण म्हणजे स्वर्ग… क्रांती या व्हिडिओ म्हणताना दिसत आहे की, आईच्या हातची साधी मुगाची आमटी आणि भात….माझ्यासाठी स्वर्ग आहे. आता मी मस्त जेवणार आहे..असं ती म्हणताना दिसत आहे.तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील कमेंट करत याला होकार दर्शवला आहे.एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलं आहे की, आईच्या हाताचं जेवण म्हणजे स्वर्गच ❤️😍 तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,तुम्ही खुप नशिबवान आहात की आईचं प्रेम जेवणाच्या स्वरूपात मिळतं?😍 तर आणखी एकानं म्हटलं आहे की,🙌😍😍😍😍😍😍😍😍आई चा हाथची चव ☺️😘😘म्हणजे देवी च्या रूपात दिलेला प्रसाद 🙏🏻 अशा अनेक कमेंट क्रांतीच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. वाचा- जाळीदार फ्रॉक आणि भर उन्हात सोनाली कुलकर्णीचा वाळवंटात पाहायला मिळाला हॉट अंदाज! मध्यंतरी क्रांती आपले पती समीर वानखेडे यांच्यासोबत नागपूरमध्ये काही कामानिमित्त गेली होती. यावेळी नागपुरमधील सावजी मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉटेलात तिनं सावजी मटणावर ताव मारला होता. पण सावजी मटण खाल्यावर तिला तिखट लागल्याने सरळ नीट बोलताही येत नव्हतं. डोळे आणि चेहरा लालेलाल झाला होता. एकूण काय या मटणानं तिला चांगला घाम फोडला होता. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
क्रांती रेडकरचा जन्म 17 ऑगस्ट 1982 रोजी मुंबई येथे झाला.तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. जेव्हा ती 3 वर्षांची होती तेव्हा तिने तिच्या शाळेतील एका नाटकात मदर तेरेसा यांची भूमिका केली होती.कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने नाटकात काम करायला सुरुवात केली.क्रांती रेडकर यांचे शालेय शिक्षण कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल, मुंबई इथून पूर्ण झाले. क्रांती रेडकर यांचे कॉलेजचे शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई इथून पूर्ण झाले.
क्रांती रेडकरचा पहिला चित्रपट सून असावी अशी (2000) हा आहे.2003 मध्ये, ती अजय देवगणसोबत प्रकाश झा यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट गंगाजलमध्ये दिसली.2006 च्या मराठी चित्रपट “जत्रा” मधील “कोंबडी पळाली” या मराठी गाण्यासाठी देखील ती ओळखली जाते. यानंतर ती शहाणपण देगा देवा, नो एंट्री पुढे झोका आहे, पिपाणी आणि करार या चित्रपटांमध्ये ती दिसली. 2014 मध्ये काकण या मराठी चित्रपटातून क्रांतीने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.