JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ह्रता दुर्गुळेचा नवऱ्यासोबत रोमॅंटिक डान्स, दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते प्रेमात

ह्रता दुर्गुळेचा नवऱ्यासोबत रोमॅंटिक डान्स, दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते प्रेमात

तरुणाची लाडकी क्रश म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता प्रतिक शाह या दोघांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांची केमस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.

जाहिरात

hruta durgule

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी-    तरुणाची लाडकी क्रश म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता प्रतिक शाह या दोघांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांची केमस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. प्रतिक आणि ह्रता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघांसोबतचे रोमॅंटिक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच प्रतिकनं ह्रतासोबतचा एका रोमॅंटीक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघंही रंग सारे गुलाबी …या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मित्राच्या संगीत सोहळ्यात या दोघांनी हा रोमॅंटीक डान्स केला आहे. त्यांचा हा लव्हली डान्स चाहत्यांना देखील आवडलेला आहे. चाहत्यांनी देखील कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. कुणी वॉव तर कुणी छान…अशा अनेक कमेंट या दोघांच्या डान्स व्हिडिओवर चाहत्यांनी केल्या आहेत. तर एकानं म्हटलं आहे की, अति सुंदर डान्स केला आहे तुम्ही दोघांनी ❤️ आणि तुम्ही दोघे ही खूप छान दिसत अहात. तुमच्या दोघांना कोणाची ही नजर नको लागायला😍. वाचा- RRR चा विदेशात डंका कायम; ऑस्करआधी ‘या’ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर कोरलं नाव ह्रता आणि प्रतिक शाहने18 मे रोजी लग्नगाठ बांधली. ह्रताने गपचूप केलेल्या लग्नाने तिच्या चाहत्यांना मोठं सप्राइज मिळालं होतं. ह्रता दुर्गुळे लग्नानंतर ती टाईमपास सिनेमात दिसली. या सिनेमाने चांगलीच कमाई केली. लग्नानंतर तिनं तिचं काम सुरूच ठेवलं आहे. असं जरी असलं तरी नवऱ्यासाठी देखील वेळ काढत असते. त्याच्यासोबतचे काही फोटो व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. या दोघांची जोडी चाहत्यांची आवडती आहे.

संबंधित बातम्या

हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. हृता दुर्गुळे हिने ‘फुलपाखरू’ या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं.

प्रतिक शाह हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. प्रतिकनं आतापर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘तेरी मेरी इक जिंदगी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ यांसारख्या मालिकांचा समावेश आहे. प्रतिक शाह हे हिंदी मालिकाविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या