JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हिंदू लोकांनी अशा कलाकारांवर बहिष्कार टाकायला पाहिजे' त्या पोस्टवरून हेमांगी कवी ट्रोल

'हिंदू लोकांनी अशा कलाकारांवर बहिष्कार टाकायला पाहिजे' त्या पोस्टवरून हेमांगी कवी ट्रोल

14 तारखेला वटपैर्णिमा झाली, याबद्दल हेमांगीनं एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरून नेटकरी हेमांगीवर भडकले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून- अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियार प्रचंड सक्रीय असते. हेमांगी विविध विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होत असते. समाजातील विविध मुद्दयावर हेमांगी स्पष्टपणे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. 14 तारखेला वटपैर्णिमा झाली, याबद्दल हेमांगीनं एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरून नेटकरी हेमांगीवर भडकले आहेत. काहींनी तिला ट्रोल केलं आहे. काहीनं तिचं या पोस्टसाठी कौतुक देखील केलं आहे. काय म्हणाली आहे हेमांगी तिच्या पोस्टमध्ये? हेमांगी कवीनं तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! 😋😁 वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय? #कवीहूँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #वटपौर्णिमा वाचा- बापरे! नेहा पेंडसे आता राहते ‘इकडे’, अतुल गोगावले काय म्हणले पाहा! शेवटी ती टीप देत असं देखील म्हटलं आहे की, यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा!तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो! 😂😂..तिच्या या पोस्टवरून अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, हिंदू सण आले की काहींना त्रास सुरू होतो. दुसऱ्या धर्माच्या विरोधात बोलणार नाहीत. सर्व हिंदू लोकांनी अशा कलाकार लोकांवर बहिष्कार टाकायला पाहिजे. तर आणखी एकानं म्हटलं आहे की, मग ते इतर धर्मियांच्या सणांच्यावेळी सोकॉल्ड सेलिब्रिटीजची तोंड शिवली जातात काय?? मग बकरी ईदला बकरी ना कापता ती जर घरात पाळली तर शेरभर दूध तरी देईल…हे लॉजिक सांगायची हिम्मत आहे का??उगाच आपला चाठाळ पणा करायचा प्रत्येक बाबतीत…हिंदू सणांच्या रूढी परंपरांना टार्गेट करायचं आणि प्रसिद्धी मिळवून झोतात रहायचं आजकाल फॅशन झाली आहे.

दुसऱ्या एकानं म्हटलं आहे की, ‘किती विचित्र आहे सगळं,तुम्हाला नाही अवडत नका करू,फांदी आणून तर करूच नका तुमच्या मुंबई आणि पुणेच्या लोकांनी च फांदी ची पूजा सुरू केली,ya मगच शास्त्र समजून घ्या , वडाच् झाड हे सगळ्यात जास्त oxygen ददेत ,त्या निमित्याने आपल्याला ही oxxygen मिळेल, सगळ्यात जास्त काळ जगणार झाड वड आहे ,mhanun. त्यांला प्रार्थना करतात ,नवरे सुद्धा करतात ही पूजा ,जोड्याने करणारे व्रत आहे हे, माझ्या कडे माझे सगळे भाऊ करतात ,vadalaफेऱ्या मारतात, श्रद्धेचा भाग आहे , झाड ही लावा कोण नाही म्हणत ,पण अपल्याच सणानं काही माहिती नसताना आपणच नाव ठेवणं किट पॅट योग्य, नीट माहिती घ्या का करतात कशा साठी करतात, सात जन्म वगैरे अस काही नाही , या जन्मात त्याला नीट आयुर आरोग्य मिळो शेवटी प्रेम व्यक्त करायची शुद्ध पद्धत आहे ही, लोक 14 फेब पण करतात कि साजरे तेव्हा कोणी नाव ठेवत नाही. हिंदू धर्माच असेल तर सगळे पर्यावरण प्रेमी जागे होतात . हिंदू च नाव ठेवतात हीच शोकांतीका आहे…अशा मोठ्याच्या मोठ्या कमेंट करत नेटकऱ्य़ांनी हेमांगीवर निशाणा साधला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या