मुंबई. 09 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सवाला ( Navratri 2021) सुरुवात झाली आहे. याच उत्सवाचे औचित्यसाधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री 9 दिवस विविध देवींची रुप धारण करत हटके फोटोशुट करत असतात. दरम्यान, यामध्ये रात्रीत खेळ चाले शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीनेदेखील (navratri colours 2021) सहभार दर्शवला आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना देखील दिसत आहे. आज तिसरा दिवस आहे आणि आजचा रंग करडा आहे. यानिमित्त अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप (apurva nemlekar in goddess jaya gauri durga parmeshwari) धारण केले आहे व याचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. अपूर्वा नेमळेकरने देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे. तसेच यासाठी तिने तिच्या टिमचे कौतुक करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते.. वाचा :Bigg Boss OTT फेम उर्फी जावेद करतेय वाढदिवसाची प्रतीक्षा! कारणही आहे खास दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की,नवरात्रीचा दुसरा दिवस ! रंग - हिरवा ! देवी- मुंबादेवी, मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता 🙏🙏 मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे.🙏🙏मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! विशेष म्हणजे देवीच्या वेगवेगळ्या रुपातले फोटो शेअर करताना देवस्थानाचं महत्त्वही ती शेअर करत आहे. वाचा :‘महाकाली’ रूपात दिसली ‘आई कुठे…‘फेम रुपाली भोसले! अभिनेत्रीचं होतंय कौतुक मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतदेखील अशाच प्रकारे नारीशक्तीचा जागर करणारे नवदुर्गाच्या रुपात फोटोशूट करत असते. गेल्या काही वर्षापासून सातत्याने फोटोशूट करत याद्वारे संदेश देण्याचा ती प्रयत्न करत असते. गेल्यावर्षी कोरोनाने माजवलेला हाहाकार या काळात कोरोना वॉरिअर्स डॉक्टर्स, नर्स आणि पोलिस, सफाई कर्माचारी या सगळ्यांचे तिने आभार मानले होते.