अमृता सुभाष
मुंबई, 28 ऑक्टोबर : नाटक सिनेमा टेलिव्हिजन अशा तिन्ही माध्यमांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी, ती फुलराणी म्हणत हजारो प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बनलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष . अभिनेत्री आता केवळ या तिन माध्यमांत काम करत नसून तिनं ओटीटी माध्यमातही आपली छाप पाडली आहे. अमृता सोशल मीडियावरही सक्रीय असते. तिच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असतात.अशातच अमृतानं प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. वयाच्या 43व्या वर्षी अमृतानं तिच्या आयुष्यात मोठा निर्णय घेतलाय. अमृतानं प्रेग्नंसी टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सर्वांबरोबर शेअर केला आहे. अमृता प्रेग्नंट असल्याचं समोर येत आहे. अमृताची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृता सुभाष आणि तिची नवरा अभिनेता दिग्दर्शक संदेश कुलकर्णी दोघे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याविषयी लिहित असतात. एकमेकांचं कौतुक करत असतात. सध्या दोघे ‘पुनश्च हनिमून’ या नाटकात काम करत आहेत. नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचे अनेक मजेशीर किस्से आणि व्हिडीओ दोघेही शेअर करत असतात. अमृताची ही पोस्ट पाहून दोघांनी वयाच्या 43व्या वर्षी आई वडील होण्याचा निर्णय घेतल्यानं सर्वचं दोघांचं कौतुक करत आहेत. मात्र मी आई होणार आहे किंवा घरी पाळणा हलणार आहे याबाबत दोघांनीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. हेही वाचा - Amruta Subhash: अमृता-संदेशमध्ये ‘या’ गोष्टीने झाला मोठा इश्यू, पाहा हा मजेदार video ओह… द वंडर बिगन असं कॅप्शन देत अमृतानं प्रेग्नंसी टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट शेअर केलाय. त्याचप्रमाणे बाळाचं लाणेरंचा फोटो देखील तिनं शेअर केला आहे.
अमृताच नाही तर दुसरीकडे अभिनेत्री नित्या मेननन देखील सेम पोस्ट शेअर केली आहे. तसंच तिच्या पोस्टचं कॅप्शनही ‘ओह… द वंडर बिगन’ असंच आहे. नित्याची पोस्ट पाहून ती देखील प्रेग्नंट असल्याचं सर्वांना वाटत आहे. तिलाही अनेकांनी शुभेच्छा दिल्यात. दोघींची पोस्ट पाहता हे नव्या सिनेमा किंवा वेब सीरिजचं प्रमोशन असल्याचं वाटत आहे. मात्र अद्याप अमृता किंवा नित्या यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलेलं नाही.
अमृता आणि संदेश यांनी नुकतीच बॉलिवूड सेलेब्सबरोबर दिवाळी साजरी केली होती. अभिनेत्री तापसी पन्नूबरोबरचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. संदेश आणि अमृता सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त सतत एकत्र असतात. संदेश दररोजच्या आयुष्यातील मजेशीर गोष्टी धम्माल व्हिडीओ करत शेअर करत असतो.
अभिनेत्री अमृता सुभाष आणि तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री सुभाष यांची मासा ही शॉर्टफिल्म ‘हॉलिवूड आंतरराष्ट्रीय फिल्म डायव्हर्सिटी फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंगसाठी निवडण्यात आली होती.