JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सिद्धार्थ चांदेकरला reel करण पडलं महागात; तुमच्यासाठी देखील हा Video आहे महत्त्वाचा!

सिद्धार्थ चांदेकरला reel करण पडलं महागात; तुमच्यासाठी देखील हा Video आहे महत्त्वाचा!

सिद्धार्थ चांदेकरनं ( Siddharth Chandekar Reel) नुकतच एक असं रील्स शेअर केलं आहे जे पाहून तुमच्या लक्षात येईल की हे रील्स ट्राय करण किती महागात पडू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च- सोशल मीडियावर सध्या इन्स्टा (insta reel ) रील्सचं वारं जोरात आहे. दररोज नवीन रील्स ट्रेंड पाहायला मिळत असतं.कॉमन मॅन ते सेलेब्स सर्वांनाच रील्स भुरळ पडली आहे. आपले मराठी सेलेब्स देखील यात मागे नाहीत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर सतत नवीन व्हिडिओ असतील किंवा फोटो शेअर करत असतो. विशेषकरून तो बायको मितालीसोबत **(Mitali Mayekar)**काही भन्नाट रील्स शेअर करत असतो. सिद्धार्थ चांदेकरनं ( Siddharth Chandekar Reel) नुकतच एक असं रील्स शेअर केलं आहे जे पाहून तुमच्या लक्षात येईल की हे रील्स ट्राय करण किती महागात पडू शकते. सिद्धार्थ चांदेकरनं नवीन रील्स शेअर करत म्हटलं आहे की, हे वालं reel जरा महागात पडलं असतं. जस्ट वाचलो. कारण हे रील्स करत असताना टर्न घेण्याच्या नादात मध्येच सिद्धार्थच्या हातातून मोबईल फोन पडतो..त्यामुळे व्हिडिओ काहीसा हाल्याचा दिसत आहे. त्यामुळे मोबईल पडण्याची शिवाय स्वताचा तोल जाण्याची देखील दाट शक्यता आहे असचं दिसत आहेत.

संबंधित बातम्या

सिद्धार्थच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून मजेशीर कमेंटचा वर्षाव होत आहे. एकानं म्हटलं आहे की, मोबाईल फुटला वाटतं..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, मोबाईल सलामत तो reel हजार तर आणखी एकानं म्हटलं आहे की, महागडं रील्स आहे… तर आणि एकानं म्हटलंय की, पाली गेल्या वाटतं घरातल्या😂😂😂😂😂😂 असचं एकानं म्हटलंयी की, siddhya कसं जमतं तुला हे😂..अशा काहीशा भन्नाट प्रतिक्रिया त्याच्या रील्स वर येत आहेत. वाचा- स्वप्नील जोशीने शेअर केला घरातला Cute Video: मुलं रोज देतात हे Surprise सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी 24 जानेवारी 2021ला लग्नगाठ बांधली. मिताली आणि सिद्धार्थ या जोडीचे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या लग्नातील लूकची देखील सोशल मीडियावर रंगली होती. मराठीतील क्यूट कपल म्हणून यांना ओळखलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या