शेतकरी आणि कलाकारांमध्ये मिलिंद गवळींनी केली तुलना
मुंबई, 8 मे- आई कुठे काय करते मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेत एक पात्र असं आहे की, सतत त्याचा तिरस्कार केला जातो. पण मालिकेत अनिरुद्धचा जितका तिरस्कार केला जातो तितकचं त्याला बाहेरच्या जगात प्रेम मिळत आहे हेही तितकच खरं आहे. मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसतात. अनिरुद्धची भूमिका नकारात्मक आहे पण मिलिंद यांनी अभिनय कौशल्याच्या जीवावर ती लोकांच्यात लोकप्रिय केलेली आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. शिवाय आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरील देखील काही किस्से शेअर करताना दिसतात. मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिलिंद गवळी अनेकदा जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शेतकरी आणि कलाकारांची तुलना केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शेतकरी आणि कलाकारया दोघांमध्ये काय साम्य आहे ?दोघांमध्ये साम्य आहे का नाही आहे?मला असं वाटतं या दोघांमध्ये खूप साम्य आहे.दोघेही आयुष्यात खूप मोठी रिस्क घेतात,दोघांच्याही आयुष्यामध्ये यश अपयश हे त्यांच्या हातात नसतं,शेतकऱ्यासाठी वेळेवर पेरणी झाली वेळेवर पाऊस झाला तरच त्याला यश मिळू शकतो, कलाकारासाठी पण योग्य ती भूमिका मिळाली, या पद्धतीने साकारता आली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, शिक्षकांना ती आवडली, तरच त्याला यश मिळतं. वाचा- ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर तामिळनाडूत घातली बंदी; काय आहे कारण? अतोनात कष्ट करणे या दोघांच्या नशिबात आहे,पण कष्ट केल्यामुळे त् या दोघांनाही त्याचं यश मिळेलच याची शाश्वती नाही.दोघांकडेही खूप आदरणीय आणि कौतुकाने पाहिलं जातं,लोकांना किंवा प्रेक्षकांना त्यांच्या कष्टाची जाणीव असते,पण दोघेही एकदा मार्केटमध्ये आले की त्याची किंमत लावली जाते, कधी कधी तर त्या सगळ्या कष्टाची किंमत शून्य होऊन जाते, कित्येकदा शेतकऱ्याचा माल रस्त्यावर शेतकरी फेकून देतो, कारण मार्केटमध्ये त्याच्या मालाला काहीच भाव मिळत नाही. तसंच लाखो करोडो चा सिनेमा कोणीही विकत घ्यायला तयार नसतो थेटरमध्ये तो लागत नाही आणि त्या सिनेमाची किंमत शून्य होऊन जाते.
किंवा एक मराठी सिनेमा चा producer आणि शेतकरी हजार हून अधिक सिनेमे जे बनवून तयार आहेत सेन्सर झालेले आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्याची किंमत शून्य झालेली आहे, एक मराठीचा प्रोड्युसर आणि एक शेतकरी याच्यामध्ये फारसा फरक मला जाणवत नाही.लोकांनी त्याला आधार द्यायचा म्हटलं तरी सुद्धा ते शक्य होत नाही, शासनाच्या असंख्य schemes, subsidiesफक्त कागदावरच छान छान दिसतात, आकर्षक दिसतात,याचा प्रत्यक्ष न शेतकऱ्याला मराठी प्रोड्युसराला फायदा होतो, उगाच का इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, उगाच का एक प्रोड्युसर मराठी चित्रपट बनवतो आणि नंतर तो कालबाह्य किंवा गायब होतो तो कधी कोणाला दिसतच नाही त्याचं, त्याच्याबद्दल कोणालाही कधीही काही माहिती नसते.
याचं माझ्या मते मुख्य कारण काय असेल तर ज्या माणसाला कृषी विभाग दिला जातो, कृषिमंत्री केलं जातं, कृषी विभागाचे सेक्रेटरी वगैरे असतात, त्यांचा शेतीशी काही संबंध नसतो, ती कधीही शेतात राबलेले नसतात शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्याच त्यांना कळत नाही माहित नसतात, आणि तसंच सांस्कृतिक विभागात तीच परिस्थिती आहे, जर असं केलं तर सांस्कृतिक मंत्री त्यालाच बनवायचं, त्याचा कलेशी संबंध आहे, संस्कृती विभागात त्यालाच अपॉइंट करायचं त्याला क्लासिकल डान्स येतो, तो एक कलाकार आहे, आणि त्याला ऍडमिनिस्ट्रेशन पण येतं.