JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सलमानला टफ द्यायचं की काय' वर्तुळ मोजणाऱ्या ललित प्रभाकरच्या फोटोने कल्ला

'सलमानला टफ द्यायचं की काय' वर्तुळ मोजणाऱ्या ललित प्रभाकरच्या फोटोने कल्ला

नुकताच ललित प्रभाकरनं एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने वर्तुळाचं क्षेत्रफळ मोजायची प्राचीन पद्धत सांगितली आहे. हा फोटो पाहून तुम्ही देखील चक्रावाल!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मार्च- हॅन्ड्सम हंक अभिनेता ललित प्रभाकरची **(lalit Prabhakar)**तरुणीमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ललित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. विविध फोटो व व्हिडिओ तसेच कामाबद्दल अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच ललितने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते तर चक्रावलेच आहेत शिवाय तुम्ही देखील चक्रावाल असाच काहीसा हा फोटो आहे. ललितच्या **(Lalit Prabhakar Latest Photo)**फोटो इतकीच त्याने दिलेल्या कॅप्शनची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ललित प्रभाकरनं नुकताच इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय त्याच्या कॅप्शनची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे. त्याने त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, खरं सांगतो, वर्तुळाचं क्षेत्रफळ मोजायच्या काही प्राचीन पद्धती अजून अस्तित्वात आहेत. वाचा- अर्जुनला सोडून मलायकाने धरला मराठी BB विजेता शिव ठाकरेचा हात,video viral ललितच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, अन त्यात स्वतः वर मेहनत घेतलेली पण दाखवायची होती….अस म्हणायला हरकत नाही..पण overall ….सलमान ला टफ द्यायचं की काय ..बहूतेक ती पण एक शक्यता आहे…सिंगल राहायचं तर ठरवलं आहे अन आता जोरदार workout. .सही है बॉस….. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की, मग काय आहे? क्षेत्रफळ..तर आणखी एकाने म्हटलं आहे की, eometry मध्ये interest वाढणार अश्या style ने शिकवली तर….byjus n all बाकीसगळे फिके तुझ्यापुढे तर असंच एकाने म्हटलं आहे की, आणखी पद्धती पाहण्यास आवडतील♥️..अशा अनेक कमेंट त्याच्या या व्हिडिओवर आल्या आहेत.

संबंधित बातम्या

ललितने काही दिवसापूर्वी एक शर्टलेस फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होते की, ‘प्रश्न पोटा पाण्याचा असला तरी पाठा पाण्याला विसरून चालणार नाही’. त्याच्या या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. वाचा- विजय गोखलेंच्या भेटीने उत्कर्ष शिंदे गेला भारावून, फोटो पोस्ट करत म्हणाला.. ललितने मराठी मालिका तसेच सिनेमांमध्ये त्याच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. नुकत्याच आलेल्या झोंबिवली सिनेमात त्याची वेगळी बाजू पाहायला मिळाली. त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. ‘झोंबिवली’(Zombivali Film) हा पहिला मराठी हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अमेय वाघ,(Amey Wagh) अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi parshurami ) यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या