मुंबई, 23 एप्रिल- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यापैकी अमेय वाघ**( amey wagh )** एक आहे. अमेय वाघ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या हटके सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच तो सर्वांचे लक्षवेधून घेत असतो. नुकताच अमेयने त्याचा एक त्याचा भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिजिओला त्यानं नेहमीप्रमाणे एक सैराट कॅप्शन देखील दिली आहे. सध्या अमेयची पोस्ट ( amey wagh latest post) सोशल मीडियावर मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. अभिनेता अमेय वाघनं त्याच्या इन्स्टाला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो कार चालवत मस्त गाणं म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओला त्यानं भन्नाट कॅप्शन देखील दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की मराठी गाण्यांवरच चांगले reels बनवता येतात! 😁❤️“मी वसंतराव” चा तिसरा आठवडा सुरु! लवकर बघा! #favouritesong #runningsuccessfully 🎥 @sajirid. वाचा- World Book Day 2022:‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती सध्या वाचतेय ‘ही’ पुस्तके चाहत्यांनी देखील अमेय वाघच्या या गाण्यात दाद दिली आहे. एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, वा…वा.. बुवा..तर एकानं म्हटलं आहे वा..वा…वाघोबा…. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, नवीन संगीतकरचा उदय 👏👏👏😂😂 तर आणखी एकानं म्हटलं आहे की, क्या बात है अमेय जी बोले तो एकदम झक्कास 👌👌👌…अशा अनेक कमेंट अमेयच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. तर आनेकांनी त्याच्या व्हिडिओ कॅप्शनचं देखील कौतुक केलं आहे.
अमेय वाघची ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याशिवाय अमेय वाघच्या ‘झोंबिवली’ (Zombivali) या सिनेमातील अभिनयाचे कौतुक झालं. याशिवाय ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’,‘धुरळा’ अशा अनेक चित्रपटात अमेयने आपल्या अभिनयाचा ठसा उमठविला आहे.