JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बहुचर्चित 'अनन्या'चा टीजर रिलीज, यादिवशी रिलीज होणार हृता दुर्गुळेचा सिनेमा

बहुचर्चित 'अनन्या'चा टीजर रिलीज, यादिवशी रिलीज होणार हृता दुर्गुळेचा सिनेमा

प्रताप फड (Pratap Phad) दिग्दर्शित ‘अनन्या’ (Ananya) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यांनतर आता या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हृताला या नव्या अंदाजात पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे-   प्रताप फड   (Pratap Phad)  दिग्दर्शित ‘अनन्या’ (Ananya)  या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यांनतर आता या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हृताला या नव्या अंदाजात पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. आज या चित्रपटाचा अनोखा टीजर समोर आला आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ यामध्ये दिसली होती. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे.येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, “या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीजरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल, हे मी खात्रीने सांगतो. अनन्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.’’ (हे वाचा: ‘एक दरवाजा बंद होतो तेव्हा…’,केदार शिंदेंची पोस्ट नेमकी कशाबाबत? **)** एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मिती ‘अनन्या’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रताप फड यांनी सांभाळली आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची जबाबदारी निभावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या