JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मनोज वाजपेयी शाहरूख खानसोबत पहिल्यांदाच डिस्कोमध्ये गेला होता स्लिपर घालून, मग झालं असं काही....

मनोज वाजपेयी शाहरूख खानसोबत पहिल्यांदाच डिस्कोमध्ये गेला होता स्लिपर घालून, मग झालं असं काही....

शाहरूख खान मला पहिल्यांदा डिक्सोत घेऊन गेला होता. मी त्यावेळी क्लबमध्ये चक्क चप्पल घालून गेलो होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी- मनोज वाजपेयी या नावाला कुठल्या ओळखीची गरज नाही. नाव, काम आणि पैसा यातील कशाचीच कमी मनोज वाजपेयीला नाही.. आज यशाच्या शिखरावर असलेल्या मनोज वाजपेयीचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अभिनय क्षेत्रात मनोज वाजपेयी हे मोठं नाव असलं तरी त्याचा प्रवास हा संघर्षाने भरलेला असाच राहिला आहे. मनोज आजही जुने दिवस विसरलेला नाही, त्याची जमीनीशी नाळ घट्ट आहे. मनोज वाजपेयीनं नुकताच शाहरूख खानसोबतचा एका मजेदार किस्सा सांगितला आहे. मूळ बिहारचा असलेला मनोज वाजपेयीने नाटकांपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. मात्र मनोज वाजपेयीला 1998 साली आलेल्या ‘सत्या’ या चित्रपटानं त्याला त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या चित्रपटात भिकू म्हात्रे ही भूमिका करुन तो रातोरात सुपरस्टार झाला. मात्र, प्रसिद्ध मिळण्यापूर्वी मनोज वाजपेयीने प्रचंड हालाखीचं आयुष्य जगलं आहे. नुकतच त्यानं एका मुलाखतीत अभिनेता शाहरुख खानसोबत नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे चांगले शूजदेखील नव्हते. त्यामुळे तो चक्क स्लिपर घालून नाईट क्लबमध्ये पोहोचल्याचं त्याने सांगितलं आहे. वाचा- कॉटनची साडी अन् केसाची वेणी, हुबेहुब अरुंधतीसारखी दिसणारी दुसरी अभिनेत्री कोण? मनोजनं सांगितलं की, खूप जूनी गोष्ट आहे. दिल्लीत एक घुंघरू नावाचा नाईट क्लब होता. त्यावेळी शाहरूख खान मला पहिल्यांदा डिक्सोत घेऊन गेला होता. मी त्यावेळी क्लबमध्ये चक्क चप्पल घालून गेलो होतो. त्यावेळी त्या लोकांमध्ये सगळ्यात गरीब व्यक्ती मीच होतो. माझ्या पायातली चप्पल पाहून कसंबसं करुन आम्ही शूजची व्यवस्था केली आणि मग मी त्या क्लबमध्ये प्रवेश केला,असं मनोज वाजपेयी म्हणाला. माझ्या आय़ुष्यत मी पहिल्यांदाच नाईट क्लब पाहिला होता. लोक डान्स करत होते मात्र मी एका कोपऱ्यात बसून वाईन पित होतो. मी त्यावेळी तिथं सगळ्यात गरीब माणूस होतो. पहिल्यांदा डिस्कोत जाण्याबद्दल मागील वर्षी देखील मनोजनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

मनोज वाजपेयी ‘द फॅमेली मॅन’ या सिरीजमुळे खास र्चर्चेत राहिले. मनोज वाजपेयीचा लवकरच ‘गुलमोहर’ हा आगामी चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं मनोज जोरदार प्रमोशन करत या सिरीजमध्ये मनोज वाजपेयी शर्मिला टागोर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या