JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Manoj Bajpayee: 'तेव्हा इतकी दारू प्यायलो कि...' मनोज बाजपेयींनी सांगिलेला हा किस्सा ऐकून व्हाल चकित

Manoj Bajpayee: 'तेव्हा इतकी दारू प्यायलो कि...' मनोज बाजपेयींनी सांगिलेला हा किस्सा ऐकून व्हाल चकित

आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये फुकट दारू मिळाल्यानंतर मनोज बाजपेयींनी खूप मद्यपान करण्यास सुरुवात केली तेव्हा काय झालं हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. त्यांनी सांगितलेला हा किस्सा खूपच व्हायरल होत आहे.

जाहिरात

मनोज बाजपेयी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल: मनोज बाजपेयी हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास खूपच रंजक होता. मनोज यांनी शून्यापासून सुरुवात करत आज चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एका छोट्या गावापासून ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीपर्यंत त्यांचा प्रवास खूपच खडतर होता. मनोज अनेकदा त्यांच्या संघर्षाच्या कथा सांगत असतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटदरम्यान त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये फुकट दारू मिळाल्यानंतर मनोजने खूप मद्यपान करण्यास सुरुवात केली तेव्हा काय झाले हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. त्यांनी सांगितलेला हा किस्सा खूपच व्हायरल होत आहे. मनोज बाजपेयी पहिल्यांदाच देशाबाहेर पॅरिसच्या सहलीला गेले होते. थिएटर करत असताना ते एका एक्सचेंज प्रोग्रामचा भाग असणार होते. यावेळी जेव्हा त्यांना पहिल्यांदा विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली तेव्हा ते चांगलेच उत्साहात होते. तेव्हा त्यांना विमानात मोफत दारू दिली जात असल्याची माहिती मिळाल्याने ही उत्सुकता  आणखी वाढली.

त्या घटनेची आठवण करून देताना मनोज बाजपेयी म्हणाले, ‘बाजपेयी म्हणाले की जेव्हा ते विमानामध्ये बसले होते तेव्हा त्यानी दारू अजिबात घेतली नाही, कारण त्यांच्याकडून पैसे घेतले जातील असे त्यांना वाटत होते आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण नंतर त्यांना कळाले की. विमानात मोफत दारू दिली जाते. त्यासाठी वेगळे पैसे घेतले जात नाही. तेव्हा परतीच्या प्रवासात विमानामध्ये मनोज बाजपेयींनी प्रचंड दारु पिली होती. आणि अती दारु पिल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. Ileana D’Cruz: लग्न न करताच आई होणार ‘बर्फी’ फेम अभिनेत्री; कतरिनाच्या भावासोबत रंगल्या डेटिंगच्या चर्चा आपल्या पहिल्या पॅरिस दौऱ्याचा किस्सा आठवताना मनोज बाजपेयी म्हणाले की, जेव्हा ते युरोपला गेले तेव्हा त्यांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्यामध्ये चॉपस्टिक्ससह अन्न कसे खावे याचाही समावेश होता. मनोजने चॉपस्टिकने अन्न खाण्याचाही प्रयत्न केला, पण त्यातून अन्न पुन्हा पुन्हा खाली पडत होते. अनेकदा प्रयत्न करूनही मनोजला चॉपस्टिक्सने अन्न खाता आले नाही. तेव्हा च एका महिलेने त्यांना मदत केली. पार्टीतील एका महिलेने त्यांना काटा चमचा दिला आणि तुम्ही यातून खाऊ शकता, असे सांगितले. पण त्यानंतर संतापलेल्या मनोजने कधीही चॉपस्टिक्सने जेवण केलं नाही.

संबंधित बातम्या

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी सध्या त्याच्या आगामी ‘साम बहादूर’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. विकी कौशल आणि मनोज बाजपेयी स्टारर या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ‘सॅम बहादूर’ यावर्षी १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर मनोज बाजपेयी ‘द फॅमेली मॅन’ वेबसिरीजच्या तिसऱ्या भागात देखील लवकरच दिसणार आहेत. या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या