JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रजनीकांत-बियर ग्रिल्स यांच्या ‘इन टू द वाइल्ड’चा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

रजनीकांत-बियर ग्रिल्स यांच्या ‘इन टू द वाइल्ड’चा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

मॅन वर्सेज वाइल्डच्या थीमवर आधारित ‘इन टू द वाइल्ड’मध्ये बियर ग्रिल्ससोबत सुपरस्टार रजनीकांत दिसणार आहेत.

जाहिरात

wwww

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : लोकप्रिय शो मॅन वर्सेज वाइल्डच्या थीमवर आधारित ‘इन टू द वाइल्ड’मध्ये बियर ग्रिल्ससोबत सुपरस्टार रजनीकांत दिसणार आहेत. या शोचा टीझर रिलीज झाला आहे. मागच्या बऱ्याच काळापासून रजनीकांत यांचे चाहते या टीझरची आतुरतेनं वाट पाहत होते. संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या बियर ग्रिल्सच्या मॅन वर्सेस वाइल्डचा लक्ष्य आता भारत आहे. अगदी सुरुवातीलाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शो मध्ये दिसल्यानं पहिलाच एपिसोड खूप हीट झाला होता. त्यानंतर या शोच्या मेकर्सनी पुढच्या एपिसोडसाठी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची निवड केली आहे.

बांदीपूरच्या वाघ अभयारण्यात रजनीकांत यांनी या शोचं शूट केलं आहे. या शोचं शूट करताना रजनीकांत यांनी काही प्रमाणात दुखापतही झाली होती. याबद्दल बोलताना वनाधिकाऱ्यांनी सांगितलं, शोच्या शूटिंग दरम्यान रजनीकांत यांचं संतुलन बिघडलं ज्यामुळे त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. तर हातला कोपराखाली सुद्धा काही किरकोळ जखमा झाल्या आहेत. पण यातून आता रजनीकांत पूर्णतः ठीक झाले आहेत. अखेर अण्णा नाईकांनी शेवंता नाही तर माईंबरोबर केला रोमान्स, VIDEO एकदा पाहाच

सूत्रांच्या माहितीनुसार या शोच्या शूटिंगसाठी 28 ते 30 जानेवारी या काळात स्पेशल गेस्टसोबत 6-6 तासांच्या शूटिंगची परवानगी देण्यात आली होती. रजनीकांतनंतर अभिनेता अक्षय कुमार सुद्धा या शोमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या शोचं शूटिंग सुलतान बटेरी हायवे, मेल्लाहल्ली, मुद्दर आणि कल्केरे रेंज या भागात केलं जाणार आहे. हा नॉन टुरिझम झोन असून खास वनसुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली हे शूट केलं जाणार आहे. नेहा कक्करच्या ‘गोवा बीच’वर शहनाझचा धमाकेदार TikTok व्हिडीओ, चाहते म्हणाले… ‘डू यू लव मी’ म्हणतं दिशा पाटनीनं केलं चाहत्यांना घायाळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या