JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BTS VIDEO : 'मन उडू उडू झालं' मालिकेत शेवटी काय घडणार? शेवटच्या सीनचा VIDEO आला समोर

BTS VIDEO : 'मन उडू उडू झालं' मालिकेत शेवटी काय घडणार? शेवटच्या सीनचा VIDEO आला समोर

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका बंद होणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचा BTS व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणारी लोकप्रिय मालिका ‘मन ‘उडू उडू झालं’ (Man udu udu zhala)लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेचे चाहते भावूक झालेले पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या या मालिकेविषयी तुफान चर्चा होताना दिसतेय. या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या स्पर्धेतही विविध मालिकांना मागे टाकलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून टीआरपी घसरल्याने मालिका बंद होत आहे अशा चर्चा आहेत. मात्र मालिका बंद होण्याविषयी अद्याप काही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अशातच मालिकेविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका बंद होणार आहे. मालिकेत दिपूची भूमिका हृता दुर्गुळेनं साकारलेली पहायला मिळाली तर इंद्राची भूमिका अजिंक्य राऊतनं. नुकताच सोशल मीडियावर या मालिकेच्या बॅंकेतील शेवटच्या एपिसोडचा BTS व्हिडीओ व्हायरल होत आहे. मालकितील लाडक्या दिपू आणि इंद्राचा गोड शेवट करुन ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. हेही वाचा -  Timepass 3: दीपू vsस्वीटू; टेलिव्हिजनच्या दोन प्रसिद्ध नायिका आमने-सामने व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, ऑफिसमधला लास्ट सीन आहे आणि सगळे कलाकार भावूक झाले आहेत. व्हिडीओ पाहून मालिकेचे चाहते आणि दिपू आणि इंद्राचे चाहतेही खूप भावूक झाले आहेत. लास्ट सीनचा व्हायरल होणाऱ्या BTS व्हिडीओवर अनेक भावनिक प्रतिक्रिया येत आहे.

संबंधित बातम्या

इंद्रा आणि दिपूचा गोड शेवट शूट करुन मालिकेचाही शेवट गोड करत ही मालिका संपणार आहे. त्यामुळे कलाकार, चाहते, संपूर्ण टीमसाठी हा मोठा भावनिक क्षण आहे. मालिकेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. चाहतेही अनेक स्टोरी, पोस्ट करत भावनिक झालेले पहायला मिळतायेत. दरम्यान, ‘मन ‘उडू उडू झालं’ मालिका संपताच त्याच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तू चाल पुढं’ ही नवी मालिका सुरू होत असून मालिकेचा प्रोमो देखील समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या