मुंबई, 17 जुलै- झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही लोकप्रिय मालिका सध्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंगदेखील पूर्ण झालं आहे. दरम्यान सेटवरील अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळाले होते. यामध्ये मालिकेची टीम इमोशनल होतानासुद्धा दिसून आली होती.कलाकार एकमेकांसोबतच्या प्रत्येक आठवणी सोबत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. अशातच आता अभिनेत्री रीना मधुकरने आपल्या टीमला एक खास गिफ्ट दिलं आहे. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय दिलंय. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय झाली होती. शिवाय मालिकेचं टायटल सॉन्गदेखील अतिशय हिट ठरलं होतं. इतकंच नव्हे तर मालिकेच्या प्रत्येक कलाकाराला एक नवी ओळख या मालिकेने मिळवून दिली आहे. ‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. या मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे. सानिकाची भूमिका नकारात्मक असली, तरी तिला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. तसेच रीना सोशल मीडियात प्रचंड सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या या मालिकेच्या टीमला दिलेलं एक खास गिफ्ट केलं आहे. रीना मधुकर पोस्ट- बरेच दिवस विचार करत होते की, माझ्या MUUZ परिवाराला काय गिफ्ट देऊ… काहीतरी असं द्यायचं होतं जे कायम डोळ्यासमोर आणि आठवणीत राहील… खूप Options बघितले पण काही आवडलं नाही… आणि तेवढ्यात @tejdharart आठवलं. Last Minute Order देऊन सुद्धा Tejashree ने खूप Promptly हे Fridge Magnets Design केले आणि Before Time Delivery दिली…खरंच Hats Off! सगळ्यांना हे Memento खूप आवडले… '
(हे वाचा: Prajakta Mali: ‘मी एकटीच का?’, पोस्ट शेअर करत प्राजक्ता माळीचा थेट सवाल ) यापूर्वी रीनानं मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे.