बॅक टू सेट! लग्नानंतर हृता लागली कामाला; नाटकाच्या प्रयोगानंतर मालिकेच्या शुटींगला सुरुवात
मुंबई, 30 मे: अभिनेत्री ‘हृता दुर्गुळे’ने गुपचूप (Hruta Durgule) लग्न उरकून तिच्या चाहत्यांना मोठ सप्राइज दिलं. हृताने हिंदी टेलिव्हिजनवरील दिग्दर्शक निर्माता ‘प्रतीक शाह’ (Prateek Shah) सोबत 18 मे रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी मुंबईतच लग्न केलं. लग्नाला नातेवाईक आणि जवळची मित्र मैत्रिणी उपस्थित होते. महाराष्ट्राची लाडकी क्रश हृताच्या लग्नाने अनेक तरुणांना धक्का बसला. लग्नानंतर हृता तुर्की येथे हनिमूनसाठी गेली होती. दोघांनी तुर्कीतील इस्तानबूल येथे सुट्ट्यांचा आनंद लुटला. (Hruta Durgule Honeymoon) हनिमून आटोपून हृता नुकतीच भारतात पतरली असून कोणताही वेळ न दवडता तिने कामाला सुरुवात केली आहे. हृताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती माहिती दिलीय. लग्नानंतर हृताने थेट रंगमंचापासून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ (Dada ek Good News Ahe) या नाटकाचा प्रयोग काल ठाण्याच्या गडकरी रंगायतनला रंगला. हृता यात प्रमुख भूमिकेत असून लग्नानंतर तिने नाटकाचा प्रयोग करुन कामाला सुरुवात केली आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला. हृताच्या नवीन आयुष्यासाठी अनेक प्रेक्षकांनी तिला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
रविवारच्या नाटकाच्या प्रयोगानंतर अखेर सोमवारपासून हृताने ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Jhal) मालिकेच्या शुटींगला सुरुवात केली. हृताने मेकअप रुममधील तिला मिरर सेल्फी व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. मन उडू उडू झालं मालिकेतील दीपू आणि इंद्रा ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. परंतू हृताने मालिकेतून काही दिवसांची सुट्टी घेतल्याने मालिकेतून दीपू गायब झाली होती. दीपूचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. परंतू आता हृता भारतात परत आल्याने मालिकेतील दीपूच्या अपघाताचा ट्रॅकही पुढे सरकणार आहे. हृताने मन उडू उडू झालं मालिकेच्या शुटींगला सुरुवात केल्याने आता मालिकेतून दीपू लवकरच कोमातून बाहेर येणार असून मालिका पुन्हा आपल्या मेन ट्रॅकवर येणार आहे. हृताने हनिमूनचे अनेक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या इस्तानबूलमधील हनिमूनचा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हृताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हृता पुढील काही दिवसात वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अनन्या’ (Ananya) हा हृताचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर हृताचा रावडी अंदाज ‘टाईमपास 3’ (Timepass 3) या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.