JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

...म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

मोहम्मदने त्याच्या खिशातली एक बाटली काढून त्यातील द्रव प्यायले. ते द्रव प्यायल्यानंतर त्याची तब्येत ढासळली ज्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करावं लागलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जून- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने एवढ्या वर्षांच्या आपल्या मेहनतीने स्वतःचा असा एक चाहता वर्ग तयार केला आहे. एकीकडे आमिर त्याच्या सिनेमांनी लोकांचं मनोरंजन करत आहे तर दुसरीकडे पाणी फाउंडेशनच्या कामाने तो लोकांनी मनं जिंकत आहे. या सगळ्यात आता त्याच्याशी निगडीत एक अशी बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्हाला धक्का बसेल. जोरदार हवेने ‘या’ अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस आमिर खानसाठी त्याचे चाहते वाटेल ते करायला तयार असतात. पण मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्या एका चाहत्याने आमिरच्या ऑफिसच्याबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेळगाव, कर्नाटक येथील मोहम्मद कासिम या व्यक्तिने आमिरच्या मुंबई येथील ऑफिसच्या बाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. मोहम्मदला आमिरला भेटायचे होते, मात्र आमिरच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला भेटू दिले नाही. यानंतर मोहम्मदने त्याच्या खिशातली एक बाटली काढून त्यातील द्रव प्यायले. ते द्रव प्यायल्यानंतर त्याची तब्येत ढासळली ज्यामुळे त्वरीत त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करावं लागलं. आजही सलमानला आठवतात त्याचे ‘हे’ 5 सहकलाकार मीडिया रिपोर्टनुसार, मोहम्मदला रुग्णालयात भरती केल्यानंतर पोलिसांना याबद्दल कळविण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, त्या बाटलीतले द्रव प्यायल्यामुळे मोहम्मदची तब्येतीचं कोणतंच नुकसान झालं नाही. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोहम्मदने स्पष्ट केलं की, गेल्या अनेक दिवसांपासून त्याला आमिर खानला भेटायचे होते. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही तो आमिरपर्यंत पोहोचू शकला नाही. अखेर पोलिसांनी मोहम्मदच्या घरच्यांना या सर्व घटनेबद्दल कळवले आणि त्यांच्याकडे सुपूर्द केले. बायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान घरी परतणार VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या